इराणमधून ६०० टन कांद्याची आयात

नवी मुंबई – सोमवारी मुंबईच्या जेएनपीटी बंदरात इराणमधून आयात करण्यात आलेल्या ६०० टन कांद्यापैकी २५ टन कांदा दाखल झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात परतीच्या पावसामुळे कांद्याच्या पिकाचे झालेले नुकसान झाले आहे. तसेच बाजारात निर्माण झालेल्या कांद्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. यानंतर व्यापाऱ्यांनी परदेशातून कांद्याची आयात सुरु केली आहे. यापैकी काही कांदा तामिळनाडू आणि कर्नाटकच्या बाजारात पाठविण्यात आला आहे.

६०० टन

रविवारी घाऊक बाजारात ६० रूपये किलोंपर्यत पोहोचलेले कांद्याचे भाव सोमवारी ८५ रूपये प्रती किलो पोहोचले होते. किरकोळ बाजारात देखील कांद्याचा दर प्रतिकिलो १०० ते ११० रूपयांवर गेला तर भिजलेल्या कांद्याची विक्री ८० ते ९० रूपयांनी केली जात आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी नवी मुंबईच्या एपीएमसीत इराणमधून २५ टन कांद्याच्या एक कंटेनर दाखल झाला. कांद्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून कांद्याची आयात करण्यात आली असून जवळपास ६०० टन कांदा मागविण्यात आला आहे.

६०० टन

गणेशोत्सवापासूनच कांद्याचे दर वधारले होते. पण दाखल होणारा कांदा खराब निघत होता. त्यात परतीच्या पावसाने कांद्याचे मोठे नुकसान केले. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांनी लावलेली कांद्याची पीक अनेक ठिकाणी पाण्याखाली गेले. याने कांद्याची आवक कमी झाली होती. यामुळेच कांद्याच्या दरात चढ-उतार पहायला मिळत आहे.

leave a reply