केंद्र सरकार ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी’ आणणार

- एनएसए अजित डोवल

नवी दिल्ली – ”देशात सायबर हल्ले ५०० टक्क्याने वाढले आहेत. कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवरील अवलंबितता वाढल्याने सायबर गुन्हेगार त्याचा फायदा उचलत आहेत आणि यामुळे सायबर गुन्ह्यात वाढ दिसून येत आहे.”, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी बजावले आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सरकार ‘नॅशनल सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी’ आणणार असल्याची माहिती डोवाल यांनी दिली आहे.

'नॅशनल सायबर सिक्युरिटी स्ट्रॅटेजी'

केरळ पोलीस आणि ‘सोसायटी फॉर द पोलिसिंग ऑफ सायबर स्पेस अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटी रिसर्च असोसिएशन’तर्फे आयोजित ‘डाटा प्रायव्हसी आणि हॅकिंग’ विषय परिषद डोवल बोलत होते. कोरोनामुळे कामाच्या पद्धतीत बरेच बदल झाले असून डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मचा प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे.याकडे कुटील हेतू असलेले काही जण संधी म्हणून पाहत आहेत. सायबर सुरक्षेबाबत जागरूकतेचा अभाव असल्यानेच सायबर गुन्ह्यांमध्ये ५०० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे, असे डोवल यांनी लक्षात आणून दिले.

”शत्रूही संकटाच्या काळात चुकीची माहिती व बातम्या पसरवून लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे. सायबर स्पेसमध्ये तरंगणारा विशाल सायबर डाटा सोन्याच्या खाणी सारखा आहे. यातून माहिती चोरीला जाणे आपल्या नागरिकांच्या प्रायव्हसी साठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहायला हवे.”, असे आवाहन डोवल यांनी केले. इंटरनेटचा वापर करताना तो जबाबदारीने करावा, अशी सूचना डोवल यांनी केली आहे.

leave a reply