चीनचा तैवानवरील हल्ला या क्षेत्रासाठी अनर्थकारी ठरेल

- ऑस्ट्रेलियाच्या संरक्षणदलप्रमुखांची चिंता

कॅनबेरा – चीनकडून तैवानवर ताबा मिळविण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. असे झाले तर इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी तो सर्वात अनर्थकारी ठरेल, अशी चिंता ऑस्ट्रेलियाचे संरक्षणदलप्रमुख जनरल अँगस कॅम्बेल यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर चीन आणि तैवानचा प्रश्‍न शांततेने सोडविण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढे यावे, असे आवाहन जनरल कॅम्बेल यांनी केले.

चीन आणि तैवानमध्ये इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील युद्धाचा भडका उडेल, असा इशारा ऑस्ट्रेलियाचे माजी संरक्षणमंत्री ख्रिस्तोफर पेन यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. तैवानचा ताबा घेण्यासाठी चीन हल्ला चढवू शकतो, असे पेन यांनी म्हटले होते. चीनचा तैवानवरील हल्ला रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही पेन म्हणाले होते.

पेन यांचा हा इशारा प्रसिद्ध होत नाही, तोच चीनच्या २५ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. यामुळे चीन तैवानवर हल्ला चढविण्यासाठी तयारी करीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील या घडामोडींवर बोलताना ऑस्ट्रेलियाचे संरक्षणदलप्रमुख जनरल कॅम्बेल यांनी चीन व तैवानमधील संघर्षामुळे मोठा अनर्थ घडेल, असा दावा केला.

leave a reply