चोवीस तासात कोरोनाचे सर्वाधिक बळी

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असली, तरी या साथीमुळे दरदिवशी होणारे मृत्यु अजूनही चार हजारांहून अधिक आहेत. मंगळवाच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात देशभरात ४ हजार ३२९ जणांचा बळी गेला. यामध्ये सोमवारी महाराष्ट्रात गेल्या हजार बळींचा समावेश होता. देशभरात आतापर्यंत चोवीस तासात कोरोना साथीमुळे झालेले हे सर्वाधिक मृत्यु आहेत. मंगळवारीही महाराष्ट्रात ६७९ जण दगावले. महाराष्ट्रासह कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, पश्‍चिम बंगाल, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये कोरोनाने सर्वाधिक बळी जात आहे. या आठ राज्यातच सुमारे ७० टक्के बळींची नोंद होत आहे.

कोरोनाचे सर्वाधिक बळीदेेशात चोवीस तासात आढळणार्‍या कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता तीन लाखांहून कमी झाली आहे. मंगळवारी केंद्री आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीनुसार देशात चोवीस तासात १ लाख ६३ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या महिनाभरातील एका दिवसात आढळलेले सर्वात कमी रुग्ण आहेत. याआधी २० एप्रिल रोजी देशात चोवीस तासात २ लाख ५९ हजार १७० रुग्णांची नोंद करण्यात आली होती. याशिवाय देशात बरे होणार्‍या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

याशिवाय देशात ४ लाख २२ हजार रुग्ण एका दिवसात बरे झाले. ही आतापर्यंत बरे झालेल्या कोरोना रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे. यामुळे देशातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या ३३ लाख ५३ हजार ७०० पर्यंत खाली आली असून बरे होणार्‍या रुग्णांचा दर ८५.६० टक्क्यांवर गेला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ यासारख्या राज्यांमध्ये आढळत असलेल्या नव्या रुग्णांपेक्षा चोवीस तासात बरे होणार्‍या रुग्णांची संख्या अधिक आहे. मंगळवारी महाराष्ट्रात २८ हजार ४३८ नवे रुग्ण आढळले, त्याचवेळी ५२ हजार ९९८ रुग्ण बरे झाले. मात्र ६७९ मृत्यूंची नोंद करण्यात आली.

कोरोनाने होणार्‍या मृत्यूंची संख्या नियंत्रणात येत नसल्याचे यातून दिसत आहे. मंगळवारी तमिळनाडूमध्ये ३६४ जणांचा बळी गेला असून ३३ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात चोवीस तासात ५२५ जण दगावले, तर ३० हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली. दिल्लीत २६५ जण दगावले आणि ४ हजार ४८२ नव्या रुग्णांची नोंद झाली. उत्तर प्रदेशात २५५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ८ हजार ७०० नवे रुग्ण आढळले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ राज्यांमधील ४८ जिल्ह्यातील जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मायक्रा कॉन्टेंमेंन झोन बनविणे हे कोरोनाविरोधातील सर्वात प्रभावी शस्त्र असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यांनी कोरोनावर विजय मिळवला, तर देश विजयी होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

leave a reply