अफगाणिस्तानात निवडणूक घेऊन सरकार स्थापन करा

- इराणच्या राष्ट्राध्यक्षांची मागणी

तेहरान/बीजिंग – तालिबानने अफगाणिस्तानात निवडणूक घेऊन जनतेच्या इच्छेने सरकार स्थापन करावे, असे आवाहन इराणचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी केले. आपल्याला लोकशाही व निवडणूक प्रक्रिया मान्य नसल्याचे तालिबानने जाहीर केले होते. तसेच तालिबानने अफगाणिस्तानसाठी इराणच्या धर्तीवर राजकीय व्यवस्था लागू करण्याची तयारी केली आहे. अशा परिस्थितीत इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी तालिबानला दिलेला हा सल्ला लक्षवेधी ठरतो.

अफगाणिस्तानात जनतेचा पाठिंबा असलेले सरकार यावे व त्यासाठी निवडणूक आवश्यक आहे, असे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी बजावले. अफगाणी जनतेचा पाठिंबा मिळाल्याखेरीज इराण तालिबानच्या राजवटीला पाठिंबा देणार नाही, असे संकेत राष्ट्राध्यक्ष रईसी यांनी दिले आहेत. त्यांची ही भूमिका तालिबानला व तालिबानच्या मागे असलेल्या पाकिस्तानसाठी फार मोठा धक्का ठरतो.

leave a reply