देशात तीन महिन्यात प्रथमच ५० हजार पेक्षा कमी रुग्णांची नोंद

नवी दिल्ली – देशात गेल्या तीन महिन्यात प्रथमच चोवीस तासात ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवार ते मंगळावर सकाळपर्यंत देशात ४६,७९० नवे रुग्ण आढळले. त्याचवेळी देशातील ॲक्टिव्ह प्रकरणाची संख्या घटली असून बरे होणाऱ्या रुग्णांचा दर ८८.६ टाक्यांवर पोहोचला आहेत.

रुग्णांची नोंद

मंगळवारी रात्रीपर्यंत देशात आतापर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ७६ लाख ४५ हजारांपर्यंत पोहोचली होती. तसेच या साथीमुळे बळी गेलेल्यांची संख्या १ लाख १६ हजारांच्या जवळ पोहोचली आहे. तसेच या साथीच्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६७ लाख ८८ हजारांच्या पुढे गेली.

मंगळवारी महाराष्ट्रात ८ हजार १५१ नवे रुग्ण आढळले, तर २१३ जणांचा मृत्यू झाला. केरळात ६,५९१ नव्या रुग्णांची नोंद झाली. आंध्र प्रदेशात ३ हजार ५०० नव्या रुग्ण सापडले. कर्नाटकात ६२९७ नव्या रुग्ण आढळले. पश्चिम बंगालमध्ये ४ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. सर्वच राज्यात रुग्ण संख्या घट होताना दिसत असून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र आता अधिक दक्षता बाळगण्याची गरज असल्याचे आवाहन केले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सणासुदीच्या दिवसांत देशवासियांना अधिक काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. ‘लॉकडाऊन संपला असला असला तरी कोरोनाची साथ संपलेली नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. सणासुदीच्या काळात बाजारात पुन्हा उत्साह संचारला आहे. मात्र गेल्या आठ महिन्यात प्रत्येक भारतीयांनी सांभाळलेली परिस्थिती बिघडू द्यायची नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

leave a reply