हॉंगकॉंगमधील चार विद्यार्थी नेत्यांना दहशतवादाच्या आरोपांखाली अटक

- वर्षभरात ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’खाली कारवाई झालेल्यांची संख्या १३०वर

हॉंगकॉंग – चीनच्या कम्युनिस्ट राजवटीकडून हॉंगकॉंगवर फिरणारा दडपशाहीचा वरवंटा अजूनही कायम असल्याचे दिसून आले. चीनच्या यंत्रणांनी हॉंगकॉंगमधील चार विद्यार्थी नेत्यांना दहशतवादाचे समर्थन करीत असल्याच्या आरोपांवरून अटक केली आहे. गेल्या महिन्यात हॉंगकॉंगच्या एका नागरिकाने पोलिस अधिकार्‍यावर हल्ला करून नंतर आत्महत्या केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना हॉंगकॉंगच्या विद्यार्थी संघटनेने सदर नागरिकाच्या मृत्यूवर शोक व्यक्त करून त्यागाबद्दल प्रशंसा केली होती. ही प्रतिक्रिया दहशतवादाचे समर्थन असल्याचा आरोप ठेऊन विद्यार्थी नेत्यांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

हॉंगकॉंगमधील चार विद्यार्थी नेत्यांना दहशतवादाच्या आरोपांखाली अटक- वर्षभरात ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’खाली कारवाई झालेल्यांची संख्या १३०वरजुलै महिन्याच्या सुरुवातीला हॉंगकॉंगच्या ‘कॉज बे’ भागात लेऊंग किन-फै नावाच्या ५० वर्षाच्या व्यक्तीने एका पोलिसाच्या पाठीत सुरा खुपसला होता. त्यानंतर फैने आत्महत्या केली होती. लेऊंग किन-फै हा राजकीय कारणांनी प्रेरित झालेला ‘लोन वुल्फ डोमेस्टिक टेररिस्ट’ असल्याचा आरोप चिनी यंत्रणांनी ठेवला होता. या घटनेनंतर युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंगच्या विद्यार्थी संघटनेने एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात लेऊंगच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करतानाच त्याने त्याग केल्याची प्रशंसा करण्यात आली होती.

त्यानंतर चिनी यंत्रणांनी कारवाई करून युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसवर तसेच संघटनेच्या कार्यालयावर धाड टाकली होती. संघटननेने निवेदन मागे घेतल्यानंतरही त्यासंदर्भातील चौकशी चालू ठेवण्यात आली होती. आता विद्यार्थी संघटनेच्या नेत्यांना अटक करून ही कारवाई संपली नसल्याचे संकेत पोलीस यंत्रणांनी दिले आहेत. विद्यार्थी संघटनेने दिलेले निवेदन दहशतवादाचा गौरव करणारे व आत्महत्येला प्रोत्साहन देणारे असल्याचा आरोप पोलीस अधिकार्‍यांनी केला. संघटनेच्या चार नेत्यांना ताब्यात घेऊन त्यांना न्यायालयात दाखल करण्यात आले असून जामिन नाकारण्यात आल्याचे समोर आले आहे.

हॉंगकॉंगमधील चार विद्यार्थी नेत्यांना दहशतवादाच्या आरोपांखाली अटक- वर्षभरात ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’खाली कारवाई झालेल्यांची संख्या १३०वरचिनी यंत्रणांची ही कारवाई गेल्या वर्षी हॉंगकॉंगवर लादलेल्या ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’चा वापर करून करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने हॉंगकॉंगवर जबरदस्तीने हा कायदा लादला होता. त्याविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला विरोध व तीव्र टीकेनंतरही चीनने त्याची आक्रमक अंमलबजावणी सुरूच ठेवली आहे. गेल्या वर्षभरात चिनी यंत्रणांनी ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’ अंतर्गत हॉंगकॉंमधील १३०हून अधिक जणांना अटक केली आहे. यात विद्यार्थी नेते, लोकशाहीवादी कार्यकर्ते, वकिल, पत्रकार यांच्यासह सामान्य नागरिकांचाही समावेश आहे. यातील बहुतांश जण तुरुंगात असून जामिनही नाकारण्यात आला आहे.

जून महिन्यात चीनने ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’चा वापर करून हॉंगकॉंगस्थित दैनिक ‘ऍपल डेलि’वर मोठी कारवाई केली होती. त्यात दैनिकाचे मालक असणार्‍या उद्योजक जिम्मी लाय यांच्यासह त्यात काम करणार्‍या अनेकांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, चीनच्या राजवटीकडून ‘नॅशनल सिक्युरिटी लॉ’चा वापर सुरक्षेसाठी नाही तर विरोधकांचा आवाज चिरडण्यासाठी केला जात असल्याचे टीकास्त्र आंतरराष्ट्रीय समुदायाने सोडले होते.

leave a reply