इस्रायलवर नवे रॉकेट हल्ले चढविण्याची हमासची धमकी

नवे रॉकेट हल्ले

गाझा – कतारने पुरविलेला निधी वेळीच आमच्या हवाली केला नाही तर इस्रायलने नव्याने रॉकेट हल्ले चढविले जातील व हे हल्ले आधीपेक्षा भयानक आणि व्यापक असतील, अशी धमकी हमासने दिली. यासाठी हमासने इस्रायलला काही तासांची मुदत दिली. या धमकीवर इस्रायलने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण यापुढे हमासला मिळणार्‍या निधीचा हिशेब केला जाईल, असे इस्रायलने काही आठवड्यांपूर्वी स्पष्ट केले होते.

गेली काही वर्षे हमास नियंत्रित गाझापट्टीसाठी कतारकडून शेकडो कोटी डॉलर्सचे सहाय्य पुरविले जाते. गाझातील विजप्रकल्प, सरकारी कर्मचार्‍यांचे पगार, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पॅलेस्टिनींसाठी हा निधी दिला जातो. गाझातील पॅलेस्टिनींना मिळणार्‍या या

नवे रॉकेट हल्ले

आंतरराष्ट्रीय सहाय्याला इस्रायलची संमती होती. पण महिन्याभरापूर्वी इस्रायलची सूत्रे हाती घेणार्‍या नफ्ताली बेनेट यांनी कतारकडून पुरविल्या जाणार्‍या या निधीवर रोख लावली आहे.

यापुढे कतारकडून गाझापट्टीसाठी दिला जाणारा निधी चौकशी आणि तपासाशिवाय पुढे पाठविला जाणार नसल्याची भूमिका बेनेट सरकारने घेतली होती. आपला हा निर्णय इस्रायलने संघर्षबंदीत मध्यस्थी करणार्‍या इजिप्तमार्गे हमासला कळविला होता. या निधीचा वापर गाझातील पॅलेस्टिनींच्या नवे रॉकेट हल्लेविकासासाठी करण्याऐवजी, हमास व इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटना याचा वापर इस्रायलविरोधी कारवायांसाठी करीत असल्याचा आरोप इस्रायल सरकारने केला होता. यामुळे खवळलेल्या हमासने इस्रायलला नव्या रॉकेट हल्ल्यांची धमकी दिली.

कतारने पुरविलेला निधी वेळीच गाझापर्यंत पोहोचविला नाही तर इस्रायलवर पुन्हा रॉकेट्सचा वर्षाव होईल. हे हल्ले आधीपेक्षा अधिक व्यापक व तीव्र असतील, असे हमासच्या दहशतवाद्याने लेबेनीज वर्तमानपत्राशी बोलताना बजावले. यासाठी इस्रायलकडे शनिवारपर्यंतची मुदत असल्याचे हमासच्या दहशतवाद्याने धमकावले. इस्रायलने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण गाझातील रुग्णांसाठी वेस्ट बँक तसेच इस्रायलमध्ये मुक्त प्रवेश दिला जाईल, अशी घोषणा इस्रायली सरकारने केली आहे.

leave a reply