मुंबईत ‘आयएसआय’ च्‍या नेटवर्कचा पर्दाफाश

ISI Networkमुंबई – जम्मू आणि काश्मीरची लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी चेंबूरमध्ये एका बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकला. येथून लडाखमधल्या भारतीय सुरक्षा दलाच्या हालचाली आणि संवेदनशील माहिती जाणून घेतली जात होती. यामागे पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चा हात असल्याचे समोर आले आहे.

मुंबईतले हे स्पाय नेटवर्क ‘व्हाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल’चा (व्हीओआयपी) वापर करून लडाखमधल्या संरक्षणदलाची संवेदनशील माहिती घेत होते. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीत या नेटवर्क संदर्भात आणखी महत्वाची माहिती समोर येईल, असा दावा केला जातो. शनिवारी मारण्यात आलेल्या या छाप्यात चीनचे सहा सीम बॉक्स जप्त करण्यात आले. यातल्या एका सीमबॉक्स मध्ये १९१ सीम कार्डस होती. तर लॅपटॉप, अँन्टेना, बॅटरीज् आणि कनेक्टरस पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.

लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर खडे ठाकलेले असताना आलेल्या या बातमीचे गांर्भीय वाढले आहे

leave a reply