जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांवरील हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड

- एनआयएचे काश्मीर खोर्‍यात १६ ठिकाणी छापे, चार जणांना अटक; तर चौकशीसाठी ५७० जण ताब्यात

श्रीनगर – गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांच्या पाच दिवसात झालेल्या सात हत्यांनी जम्मू-काश्मीरच नव्हे सर्व देश हादरून गेला होता. जम्मू-काश्मीरमध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, अशांतता व अराजकता माजविण्याच्या उद्देशाने लक्ष ठरवून हे हल्ले करण्यात आले होते. या प्रकारणा राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) तपास हाती घेत रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये एकाचवेळी विविध ठिकाणी झापे टाकले. एकूण १६ ठिकाणी एआयएने धाडी टाकल्या असून या प्रकारणात आतापर्यंत ७६० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ‘द रजिस्टन्स फ्रन्ट’ (टीआरएफ) या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. लश्कर-ए-तोबयाच्या पाकिस्तानी हस्तकांकडून अशा हल्ल्यांसाठी निर्देश मिळाल्याचे चौकशीत समोर आल्याची माहिती एनआयएच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांवरील हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड -एनआयएचे काश्मीर खोर्‍यात १६ ठिकाणी छापेगेल्या काही दिवसात काश्मिरी पोलिसांवर, तसेच सामान्य नागरिकांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. पिस्तूलासारखी लहान शस्त्र वापरून हे हल्ले केले जात असल्याचे लक्षात आले होते. गेल्या आठवड्यात अवघ्या पाच दिवसात सात जणांच्या हत्या दहशतवाद्यांनी केल्या. यामध्ये काश्मिरी पंडित असलेल्या व्यापाराबरोबर दोन शिक्षकांचा, दोन जम्मू-काश्मीर बाहेरील स्थलांतरीतांचा समावेश होता. या हत्यांनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार निदर्शने झाली व पाकिस्तानविरोधात नारेबाजी झाली. जम्मू-काश्मीर पोलिसांनी यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय याआधीच व्यक्त केला होता. तर एनआयएच्या तपासातही ही बाब उघड झाली असून या हल्ल्यांसाठी पाकिस्तानातून लश्कर-ए-तोयबाच्या हस्तकांकडून निर्देश मिळत होते, हे उघड झाले आहे.

एनआयएने रविवारी जम्मू-काश्मीरमध्ये १६ ठिकाणी धाडी टाकल्या. कुलगाम, श्रीनगर, बारामुल्लामध्ये हे छापे टाकण्यात आले. यावेळी दगडफेक करणार्‍यांसह देशविरोधी कारवाया करणार्‍यांना ७५० जणांना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांची चौकशी करण्यात येत आहे. बुधवारी दहशतवाद्यांकडून तीन जणांची हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी ‘द रजिस्टंट फ्रन्ट’ (टीआरएफ) या दहशतवादी संघटनेकडून स्वीकारण्यात आली होती. या पुढे देखील हत्या सुरूच राहतील असे टीआरएफच्या उमर वाणीने म्हटले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर एनआयएकडून छापे टाकण्यात आले. रविवारी, एनआयएने हसीन रोड कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणार्‍या आरिपोरा झेवान येथील रहिवासी नईम भट याच्या घरावर छापा टाकला. दुसरा छापा बागी नंदसिंग चट्टाबाल येथील मुश्ताक अहमद दार याच्या निवासस्थानावर टाकण्यात आला. या छाप्यादरम्यान संशयितांकडून एकूण पाच मोबाईल जप्त करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

यासह सोलीना पेयन येथील रहिवासी असलेल्या सुहेल भट, पीएस शेरगढी यांच्या घरावर छापे मारले. येथून बहाउद्दिन नौहट्टाला याला ताब्यात घेण्यात आले. येथून एक लॅपटॉप आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला. याचबरोबर टीआरएफचा कमांडर साजीद गुल यांच्या काश्मीर येथील घरावर छापा मारण्यात आला.

लश्कर-ए-तोयबाचेच नाव बदललेले रुप असलेली ‘द रजिस्टंट फ्रन्ट’ (टीआरएफ) ही दहशतवादी संघटना अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहे. २७ जून रोजी भारतीय वायुसेनेच्या तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यापूर्वी जम्मूच्या भटिंडीमधून ५ किलो आयईडी पकडण्यात आले होते. यामध्येही टीआरएफचा हात होता. दरम्यान, एनआयएने सरकारी शाळेतील ४० शिक्षकांना देखील चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळत आहे.

leave a reply