महाराष्ट्रात चोवीस तासात ४८ हजार नवे रुग्ण आढळले

४८ हजारमुंबई – शुक्रवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या सुमारे ४८ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तसेच २०२ जण या साथीमुळे दगावले आहेत. गेल्या चार दिवसात महाराष्ट्रात एक लाख ५८ हजार ८७२ इतके नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. मुंबईत सलग दुसर्‍या दिवशी आठ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’सारखा कडक निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा जनतेला दिला आहे. तसेच दोन दिवसात परिस्थिती पाहून पुढील निर्णय जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशात कोरोनाच्या नव्या लाटेत सर्वात मोठा हॉटस्पॉट महाराष्ट्र ठरला असून देशातील सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रातील ९ जिल्हे आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रात ४७,८२७ नवे रुग्ण आढळले, तर २४ हजार १२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या राज्यात २१ लाख २ हजार जण होम क्वॉरंटाईन आहेत, तर संस्थात्मक क्वारंटाईन असलेल्यांची संख्या सुमारे २० हजार आहे. मुंबईत यामधील सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबईत शुक्रवारी सायंकाळपर्यंत ८ हजार ८८३२ नवे रुग्ण आढळले, तर २० रुग्णांचा मृत्यु झाला. नागपूरमध्ये ४१०८ नव्या रुग्णांची नांेंद झाली, तर ६० जण या साथीने दगावले.

दरम्यान, पुण्यात कडक निर्बंध लादण्यात आले असून सायंकाळ ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यु लावण्यात येणार आहे. रेस्टॉरंट, शाळा बंद राहणार आहेत. तसेच दिवसा जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतही अशाच प्रकारचे निर्बंध येत्या दिवसात लागण्याची शक्यता आहे.

leave a reply