‘एनआयए’ न्यायालयाने ‘आयएस’च्या १५ दहशतवाद्यांना शिक्षा ठोठावली

नवी दिल्ली – भारतात ‘आयएस’चे नेटवर्क उभे करण्याचा कट आखणाऱ्या १५ दहशतवाद्यांना ‘एनआयए’ न्यायालयाने शनिवारी शिक्षा ठोठावली. २०१५ साली याप्रकरणात १९ जणांना अटक केली होती. भारतात ‘आयएस’ संलग्न संघटना या सर्वानी स्थापन केली होती आणि यासाठी तरुणांची भरती केली जात होती. भारतात अशा प्रकारे ‘आयएस’ संलग्न संघटना स्थापन करण्याचे हे पहिले प्रकरण होते.

शिक्षा ठोठावली

इराक आणि सीरियामध्ये ‘आयएस‘चा प्रभाव वाढलेला असताना भारतात अशाच प्रकारची दशतवादी संघटना स्थापण्याचा प्रयत्न २०१५ साली उघड झाला होता. या प्रकारणात १९ डिसेंबर २०१५ मध्ये अटक केली होती. भारतात दहशतवादी हल्ले घडविण्यासाठी आणि ‘आयएस’मध्ये तरुणाच्या भरतीसाठी सोशल मीडियाद्वारे हालचाली सुरु होत्या. यासाठी ‘जुनेद अल खलिफा’ नावाची संघटना स्थापन करण्यात आली होती.

पकडण्यात आलेले दहशतवादी ‘आयएस’चा मीडिया प्रमुख अरमान उर्फ अल हिंद उर्फ अंजान भाईच्या सोशल मीडियाद्वारे संपर्कात होते आणि त्याच्याच इशाऱ्यावर काम करीत होते, असे तपासात समोर आले. तसेच या दहशतवाद्यांच्या अटकेमुळे मोठे दहशतवादी हल्ले रोखले गेले असा दावा केला जातो. भारतात ‘आयएस’चे जाळे स्थापन करण्यासाठी काही जण आखाती देशांमध्ये गेले होते. मात्र या कटाचा खुलासा होताच या सर्वांनाही निरनिरळ्या मार्गाने अटक करून परत आणण्यात आले.

नफीस खान, मुदब्बीर शेख, अबू अनस, मुफ्ती सामी, अझर खान, अमजद खान, मोहम्मद मोईउद्दीन, असिफ अली. मोहम्मद हुसेन, सईद मुजाहिद, नजमुल हुडा, मोहम्मद ओबेदुल्लाह, मोहम्मद अलीम, मोहम्मद अफझल आणि सोहिल अहमद अशी ‘एनएआयए’ न्यायालयाने शिक्षा ठोठवलेल्या १५ जणांची नावे आहेत. यातील नफीस खानला १० वर्षांची शिक्षा ठोठाविण्यात आली आहे.

leave a reply