भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० लाखांवर

- ११ दिवसात १० लाख रुग्ण आढळले

नवी दिल्ली – भारतातील कोरोनाच्या साथीने दगावणाऱ्यांची संख्या ८२ हजारांच्या पुढे गेली आहे. तसेच देशात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे. केवळ ११ दिवसात देशातील या साथीच्या रुग्ण संख्येत १० लाखांची वाढ झाली आहे. सोमवारी एका दिवसात ८१ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती, तर मंगळवारी तितक्याच नव्या रुग्णांची भर पडल्याचे स्पष्ट होते.

५० लाखांवर

मंगळवारी महाराष्ट्रात ५१५ जणांचा बळी गेला. यामुळे राज्यातील बळींची संख्या ३० हजारांच्या पुढे गेली आहे, तसेच मृत्यू दार २.७७ वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात एका दिवसात १७ हजार नव्या रुग्णांची भर पडली. आंध्रप्रदेशात चोवीस तासात ६९ जण दगावले आणि ८८४६ नवे रुग्ण आढळले. कर्नाटकात ७ हजार ५५६ नव्या रुग्णांची नोंद झाली. तामिळनाडूत ५६६७ नवे रुग्ण सापडले.

महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून नव्या रुग्णांची उच्चांकी नोंद होत होती. गेल्या दीड आठवड्यापासून महाराष्ट्रात २० हजाराहून अधिक रुग्ण आढळत होते. तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात सुमारे १० हजार रुग्णांची नोंद होत होती. मात्र सोमवार आणि मंगळवारी या तुलनेत कमी रुग्ण सापडले असून ही बाब दिलासादायक ठरत आहे. तसेच देशात या साथीचे रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या ३९ लाख २६ हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ७८.२८ टक्क्यांवर पोहोचला असून इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक रुग्ण बरे होत आहेत, असे सरकारने म्हटले आहे.

leave a reply