रशिया, चीन व इराण तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याच्या तयारीत

मॉस्को/बीजिंग/काबुल – तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदाय तीव्र चिंता व्यक्त करीत असतानाच रशिया, चीन व इराणने तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याचे संकेत दिले आहेत. रशियन अधिकाऱ्यांनी आपण तालिबानच्या संपर्कात असल्याचा दावा करून मंगळवारी रशियन राजदूत तालिबानची भेट घेणार असल्याचे जाहीर केले. चीनने तालिबानच्या राजवटीबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची तयारी दर्शविली आहे. तर इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी, अमेरिकेच्या पराभवाचा उल्लेख करून आता अफगाणिस्तानात शांततेसाठी संधी उपलब्ध झाल्याची प्रतिक्रिया दिली.

रशिया, चीन व इराण तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याच्या तयारीततालिबानच्या सदस्यांनी सोमवारपासून राजधानी काबुलसह नजिकच्या परिसरात सशस्त्र गस्त घालण्यास सुरुवात केल्याचेही समोर आले आहे. तालिबानच्या राजवटीच्या भीतीने अनेक अफगाणी तसेच परदेशी नागरिक बाहेर पडण्याची धडपड करीत. तालिबानच्या राजवटीवरचा अविश्‍वास हे याचे प्रमुख कारण असल्याचे मानले जाते. या पार्श्‍वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघटना व पाश्‍चात्य देशांनी तालिबानविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला रशिया, चीन व इराण या देशांनी अफगाणिस्तानातील तालिबानची राजवट मान्य करण्याची तयारी सुरू केली आहे.

रविवारी इतर देश आपल्या दूतावासाच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी व ते बंद करण्यासाठी धडपडत असताना रशियाचा दूतावास नेहमीप्रमाणे कार्यरत होता, अशी माहिती समोर आली आहे. रशियाचा दूतावास तालिबानी राजवटीच्या प्रतिनिधींबरोबर संपर्कात असल्याची माहिती रशियाचे विशेष दूत झामिर काबुलोव्ह यांनी दिली.रशिया, चीन व इराण तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याच्या तयारीत

तालिबानने सशस्त्र पथक रशियन दूतावासाबाहेर तैनात केल्याचेही काबुलोव्ह यांनी सांगितले. मंगळवारी रशियाचे अफगाणिस्तानातील राजदूत तालिबानच्या प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करतील, असेही रशियन दूतांनी स्पष्ट केले. त्याचवेळी तालिबानच्या राजवटीखाली अफगाणिस्तानात ‘आयएस’ ही दहशतवादी संघटना मूळ धरण्याची शक्यता नसल्याचा दावाही त्यांनी केला. रशियापाठोपाठ चीननेही तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.रशिया, चीन व इराण तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याच्या तयारीत

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी, अफगाणिस्तानमधील नव्या राजवटीशी मैत्रीपूर्ण व सहकार्याचे संबंध ठेवण्यास चीन उत्सुक असल्याचे म्हटले आहे. ‘तालिबानने चीनबरोबर चांगले संबंध ठेवण्याची इच्छा सातत्याने व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानचा विकास व पुनर्बांधणीत चीन सहभागी होईल, अशी अपेक्षाही तालिबानने समोर मांडली आहे. आम्ही याचे स्वागत करतो. आपले भवितव्य स्वतंत्रपणे ठरविण्याच्या अफगाणी जनतेच्या अधिकाराचा चीन आदर करतो’, असे हुआ चुनयिंग यांनी सांगितले.

रशिया, चीन व इराण तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याच्या तयारीतगेल्याच महिन्यात तालिबानचे प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर व शिष्टमंडळाने चीनला भेट दिली होती. या पार्श्‍वभूमीवर चीनने तालिबानला मान्यता देण्यासंदर्भात दिलेले संकेत महत्त्वाचे ठरतात. अफगाणिस्तानचा शेजारी देश असलेल्या इराणनेही तालिबानला मान्यता देण्याची तयारी दर्शविली आहे. इराणचे मावळते परराष्ट्रमंत्री जवाद झरिफ यांनी, रविवारी अफगाणिस्तानात शांततापूर्ण मार्गाने सत्तेचे हस्तांतरण होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर सोमवारी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांनी, अमेरिकेच्या पराभवाचा उल्लेख करून अफगाणिस्तानला सुरक्षितता, नवे आयुष्य व शांततेसाठी चांगली संधी उपलब्ध झाल्याचा दावा केला.

शेजारी व बंधुत्वाचे नाते असणारा देश म्हणून अफगाणिस्तानच्या एकजुटीसाठी त्यातील सर्व गटांना इराण प्रोत्साहन देईल, असे इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले आहे. मात्र सोमवारी इराण-अफगाणिस्तानच्या सीमेवर गोळीबार झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण इराणने या बातम्या फेटाळल्या असून अशा स्वरुपाची घटना घडलेलीच नाही, असे जाहीर करून टाकले.

leave a reply