चिनी विमानांच्या घुसखोरीला तैवानचे प्रत्युत्तर

तैवानचे प्रत्युत्तरतैपेई/बीजिंग – तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी करणार्‍या चिनी विमानांना ‘वॉर्निंग’ देण्यात आल्याची माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली. शुक्रवारी चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचा ७२ वा स्थापना दिवस होता. या पार्श्‍वभूमीवर तैवानवरील दडपण वाढविण्यासाठी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’च्या (पीएलए) तब्बल २५ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली. यापूर्वी १५ जूनला तब्बल २८ चिनी विमानांनी तैवानच्या ‘एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन’मध्ये (एडीआयझेड) घुसखोरी केली होती.

शुक्रवारी सकाळपासून ‘पीएलए’कडून तैवानच्या हद्दीतील घुसखोरीला सुरुवात झाल्याची माहिती तैवानच्या संरक्षण विभागाने दिली. घुसखोरी करणार्‍या विमानांमध्ये ‘वाय-८ अँटी सबमरिन एअरक्राफ्ट’सह ‘जे-१६ फायटर जेट्स’(१८), ‘एसयु-३० जेट्स’(४) व तैवानचे प्रत्युत्तरदोन ‘एच-६ बॉम्बर्स’चा समावेश होता. गेल्या पाच महिन्यांमधली ही तिसरी मोठी घुसखोरी ठरली आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या घुसखोरीला तैवानने ठोस प्रत्युत्तर दिले असून, चिनी जेट्सना ‘वॉर्निंग’ देण्याबरोबरच ‘एअर डिफेन्स मिसाईल सिस्टिम’ तैनात केल्याची माहिती संरक्षण विभागाने दिली.

जून महिन्यात पाठवलेल्या २८ विमानांनंतर २३ सप्टेंबरला चीनच्या २४ विमानांनी तैवानच्या ‘एडीआयझेड’मध्ये घुसखोरी केली होती, अशी माहिती संरक्षण विभागाने दिली. सप्टेंबर महिन्यात ‘पीएलए’च्या ११७ विमानांनी तैवानच्या हवाईहद्दीत घुसखोरी केली होती. ही सातत्याने करण्यात येणारी घुसखोरी चीनने तैवानविरोधात सुरू केलेल्या ‘ग्रे झोन वॉरफेअर’चा भाग मानला जातो. २०१० नंतरच्या दशकात चीनने याचा वापर सुरू केला आहे. तैवानच्या संरक्षणदलांना कायम दडपणाखाली ठेवणे हा त्याचा मुख्य उद्देश मानला जातो.

तैवानचे प्रत्युत्तरदरम्यान, विमानांच्या घुसखोरीपूर्वी चीनने तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांवर टीकास्त्र सोडल्याचे समोर आले आहे. त्यासाठी कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक माओ यांच्या कवितेतील शब्दांचा वापर करण्यात आला आहे. तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वु हे मोठ्या पट्टीत घोंगावणार्‍या व रडणार्‍या माश्यांप्रमाणे आहेत, असा शेरा चीनच्या ‘तैवान अफेअर्स ऑफिस’ने आपल्या निवेदनात मारला आहे. यातील माश्यांचा उल्लेख माओच्या ‘द रिव्हर ऑल रेड’ या कवितेतील आहे. यावर प्रत्युत्तर देताना सदर टीका प्रतिक्रिया देण्याच्याही लायकीची नसल्याचे सांगून तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही बाब उडवून लावली.

पुढील आठवड्यात, फ्रान्सचे सिनेटर अलेन रिचर्ड शिष्टमंडळासह तैवान दौर्‍यावर येत आहे. या शिष्टमंडळाचे तैवानच्या परराष्ट्र विभागाने स्वागत केले असून, चीनच्या माध्यमांनी फ्रान्सची ही मूर्ख खेळी असल्याची टीका केली आहे. अमेरिकेच्या दबावाखाली ऑस्ट्रेलियाने फ्रान्सकडून पाणबुड्या खरेदी करण्यास नकार दिला होता. असे असतानाही फ्रान्स तैवानमध्ये आपले शिष्टमंडळ धाडत आहे, हा मुर्खपणा ठरतो असे चीनच्या सरकारी वर्तमानपत्राचे म्हणणे आहे.

leave a reply