अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यांमध्ये 25 जणांचा बळी

-चोवीस तासातील कारवाईत 167 तालिबानी ठार / तालिबानकडून 37 अफगाणी जवानांचे अपहरण

काबुल – अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या प्रांतात तालिबानने घडविलेल्या स्फोटांमध्ये 25 जणांचा बळी गेला. यामध्ये अफगाणी सुरक्षादलाच्या 14 जवानांचा समावेश आहे. शनिवारी रात्री तालिबानने फरयाब प्रांतात चढविलेल्या हल्ल्यात 37 अफगाणी जवानांचे अपहरण केले. तर गेल्या चोवीस तासात तालिबानच्या 167 दहशतवाद्यांना ठार केल्याची घोषणा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केली.

अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यांमध्ये 25 जणांचा बळी - चोवीस तासातील कारवाईत 167 तालिबानी ठार / तालिबानकडून 37 अफगाणी जवानांचे अपहरण16 प्रांतातील तालिबानच्या ठिकाणांवर कारवाई केल्याची माहिती अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. नांगरहार, लघमान, मैदान वरदाक, लोगार, पाकतिका, दायकूंडी, झाबूल, बदघीस, हेरात, घोर, बल्ख, जोवझान, समान्गन, बघलान, बदाखशान आणि हेल्मंडमधील कारवाईत 167 दहशतवाद्यांना ठार केले तर 59 जण जखमी झाले.

तर गेल्या चोवीस तासात तालिबानने अफगाणी संरक्षणदलाला लक्ष्य करण्यासाठी तीन मोठे हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत. यापैकी फरयाब प्रांतातील कैसर भागात अफगाणी पोलिसांच्या मुख्यालयावर तालिबानने चढविलेल्या हल्ल्यात 14 जवानांचा बळी गेला. यानंतर तालिबानने 37 जवानांचे अपहरण केले. अफगाणी यंत्रणांनी ताबडतोब या ठिकाणी ज्यादा कुमक रवाना करावी. अन्यथा तालिबानी आणखी तीस-चाळीस जणांचे अपहरण होईल, अशी चिंता वरिष्ठ अफगाणी अधिकारी नादेर सईदी यांनी व्यक्त केली.अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यांमध्ये 25 जणांचा बळी - चोवीस तासातील कारवाईत 167 तालिबानी ठार / तालिबानकडून 37 अफगाणी जवानांचे अपहरण

तर बदघीस प्रांतातील अब्कामारी येथे गस्त घालणार्‍या अफगाणी सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य करण्यासाठी तालिबानने येथील रस्त्यात बॉम्बस्फोट घडविला. पण या मार्गाने जाणारी प्रवासी बस सदर स्फोटात सापडली. यामध्ये प्रवास करणारे 11 प्रवासी जागीच ठार झाले. याशिवाय रविवारी दुपारी बल्ख प्रांतातील पोलिसांच्या मुख्यालयाजवळ तालिबानने बॉम्बस्फोट घडविल्याचे वृत्त आहे. या स्फोटात नागरी तसेच पोलीस जवानांचे बळी गेल्याचाही दावा केला जातो. पण बळींचे तपशील प्रसिद्ध झालेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून तालिबानचे दहशतवादी अफगाणी सुरक्षा यंत्रणा आणि विद्यार्थ्यांना लक्ष्य करीत असल्याची चिंता व्यक्त केली जाते. गेल्या दहा दिवसातच तालिबानने काबुलमधील तीन शाळांवर हल्ले चढविले. तर अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागातील मुलींच्या शाळांना लक्ष्य केल्याचे उघड झाले होते. तालिबानच्या या हल्ल्यांमुळे अफगाणींनी पाश्‍चिमात्य देशांच्या दिशेने धाव घेण्याची तयारी केल्याच्या बातम्या येत आहेत.अफगाणिस्तानात तालिबानच्या हल्ल्यांमध्ये 25 जणांचा बळी - चोवीस तासातील कारवाईत 167 तालिबानी ठार / तालिबानकडून 37 अफगाणी जवानांचे अपहरण

दरम्यान, आपल्या देशातील अस्थैर्य आणि तालिबानच्या हल्ल्यांसाठी कोण जबाबदार आहे, हे जगाला चांगलेच ठाऊक आहे, अशी टीका अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन दिवसांपूर्वी केली होती. थेट उल्लेख टाळला असला तरी अफगाण परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला लक्ष्य केल्याचे उघड आहे.

काही आठवड्यांपूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी पाकिस्तान तालिबानचा वापर करून अफगाणिस्तान छुपे युद्ध खेळत असल्याचा आरोप केला होता. तर अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांनी पाकिस्तानवर याहून कडक शब्दात टीकास्त्र सोडले होते. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी अफगाणिस्तानला इशारा दिला आहे.

leave a reply