जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ‘व्हर्च्युअल सिम’चा वापर

श्रीनगर – ‘व्हर्च्युअल सिम’चा वापर करून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कट आखण्यात येत आहेत. दहशतवाद्यांकडून केल्या जाणाऱ्या ‘व्हर्च्युअल सिम’च्या वापरामुळे सुरक्षायंत्रणेसमोरील आव्हाने वाढली आहेत, असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. याआधी पुलवामा हल्ला प्रकरणाचा तपास करताना दहशतवाद्यांनी अशा प्रकारचे ४० हून अधिक सिम्स वापरल्याची बाब उघड झाली होती.

'व्हर्च्युअल सिम'चा वापर

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून व्हर्च्युअल सिम वापरली जात आहेत. व्हर्च्युअल सिम अर्थात आभासी सिम हे आधुनिक तंत्रज्ञान असून अशा सेवा देणाऱ्या परदेशी कंपन्यांचे अँप आपल्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करावे लागते. आणि त्यानंतर या कंपन्यांनी दिलेला नंबर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटशी जोडता येतो. अमेरिकेबरोबर व्हर्च्युअल सिम कार्ड सेवा कॅनडा, युके, इस्त्रायलमधील टेलिकॉम कंपन्यांद्वारे दिल्या जात आहेत.

'व्हर्च्युअल सिम'चा वापरपुलवामा हल्ल्याचा तपास करताना जम्मू-काश्मीरमध्ये अशाप्रकारची आभासी सिम्सचा वापर दहशतवाद्यांकडून केला जात असल्याचे पहिल्यांदा लक्षात आले होते. कित्येक दहशतवादी सीमेपलीकडे आपल्या हस्तकांशी संपर्क ठेवण्यासाठी व्हर्च्युअल सिमचा वापर करीत आहेत. तसेच तंत्रज्ञानाद्वारेच पाकिस्तानातून दहशतवाद्यांना सूचना मिळत असून दहशतवादी हल्ल्याचे कट आखले जात आहेत, असे वृत्त आहे. मात्र दहशतवाद्यांकडून वापरल्या जात असलेल्या या नव्या कार्यपद्धतीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठी आव्हाने उभी राहिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

leave a reply