कोरोनाच्या साथीमागे ‘वुहान लॅब’च असल्याचे कितीतरी पुरावे आहेत

- अमेरिकी संसदेतील ‘रिपब्लिकन’ सदस्यांचा अहवाल

पुरावेवॉशिंग्टन – कोरोनाची साथ पसरण्यामागे चीनमधील ‘वुहान लॅब’च कारणीभूत असल्याचे कितीतरी पुरावे उपलब्ध आहेत, अशा स्वरुपाचा अहवाल अमेरिकी संसदेतील रिपब्लिकन पक्षाच्या सदस्यांनी दिला आहे. अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहातील ‘हाऊस फॉरेन अफेअर्स कमिटी’चे सदस्य माईक मॅक्कॉल यांनी सदर अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात, कोरोनाच्या उगमाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

वुहानमधील मार्केट कोरोनाचा उगम आहे, हा पर्याय आता पूर्णपणे फेटाळला जाण्याची गरज आहे. १२ सप्टेंबर, २०१९ पूर्वी कधीतरी कोरोनाचा विषाणू वुहान लॅबमधून बाहेर पडल्याचे पुरावे उपलब्ध आहेत, असेही अहवालात निदर्शनास आणण्यात आले आहे. २०१९ साली कोरोनाव्हायरसची सुरुवात झाल्यापासून चीनची याबाबतची भूमिका संशयास्पद राहिली आहे. आपल्यावर ठेवण्यात येणारा ठपका टाळण्यासाठी चीनने कोरोनाव्हायरसची माहिती सातत्याने दडपून ठेवली. तसेच त्याचा उगम इतर देशांमध्ये झाल्याचे फुटकळ दावेही प्रसिद्ध केले.

पण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या वर्षी कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमधूनच झाल्याचा उघड आरोप केला होता. त्यानंतर अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच संशोधकांनी वुहान प्रयोगशाळेकडेच बोट दाखविले होते. चीनमधून बाहेर पडलेल्या एका संशोधिकेनेही आपल्याकडे यासंदर्भात पुरावे असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मे महिन्यात अमेरिकी यंत्रणांना ‘वुहान लॅब लीक’ची चौकशी करून ९० दिवसात याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

leave a reply