जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी संयुक्त अरब अमिरातीचा भारताबरोबर करार

श्रीनगर – संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) दुबई प्रशासनाने जम्मू-काश्मीरमध्ये बांधकाम क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्यासाठी करार केला आहे. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये इंडस्ट्रीयल पार्कही युएई सरकार उभारणार आहे. दहशतवादी कारवाया करुन जम्मू-काश्मीरमध्ये अस्थीरता व अराजकता माजविण्यासाठी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना प्रयत्न करीत आहेत. जम्मू-काश्मीरमधील नव्या इंडस्ट्रीयल धोरणांतर्गत येथे वाढत असलेल्या औद्योगिक हालचाली व विकासाला खीळ घालण्याचा उद्देेशही यामागे आहे. या पार्श्‍वभूमीवर भारत आणि युएईमध्ये झालेला हा करार महत्त्वाचा ठरतो.

जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी संयुक्त अरब अमिरातीचा भारताबरोबर करारसोमवारी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला. जम्मू-काश्मीरच्या विकास यात्रेतील हा महत्वाचा दिवस असल्याचे यानंतर उपराज्यपाल सिन्हा यांनी अधोरेखित केले. यानुसार संयुक्त अरब अमिराती जम्मू-काश्मीरमध्ये आयटी टॉवर, औद्यागिक वसाहत, वैद्यकीय महाविद्यालय आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार आहे. याशिवाय इतरही पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये दुबई प्रशासनाकडून गुंतवणूक करण्यात येणार आहे. दुबईतील विविध कंपन्या व संस्थांनी जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्यात उत्सुकता दाखविल्याचे गोयल यावेळी म्हणाले.

leave a reply