अमेरिका लष्करी वाहतुकीसाठी रॉकेटचा वापर करण्याच्या तयारीत

वॉशिंग्टन – येत्या काळात अमेरिकन लष्कराची मालवाहतूक भल्या मोठ्या रॉकेटच्या सहाय्याने केली जाऊ शकते. या योजनेवर अमेरिका काम करीत आहे. यासाठी अंतराळ मोहिमांमध्ये वापरण्यात येणार्‍या ‘रियुजेबल’ रॉकेटच्या पर्यायाचा विचार सुरू असल्याची घोषणा अमेरिकी हवाईदलाने केली. याद्वारे अवघ्या एका तासात 100 टन वजनाचे साहित्य जगातील कुठल्याही ठिकाणी वाहून नेले जाईल, अशी माहिती अमेरिकेच्या हवाईदलाने दिली आहे.

अमेरिका लष्करी वाहतुकीसाठी रॉकेटचा वापर करण्याच्या तयारीतअमेरिकेच्या हवाईदलाने गेल्या आठवड्यात ‘2030 सायन्स अँड टेक्नोलॉजी स्ट्रॅटेजी’ अंतर्गत व्हेंगार्ड योजनेची घोषणा केली. अमेरिकेच्या स्पेस फोर्सच्या नेतृत्वाखाली ही योजना राबविण्यात येईल. यानुसार, भविष्यातील लष्करी मालवाहतुकीसाठी सुरक्षित आणि कमी खार्चिक पर्यायाचा वापर करण्यावर अभ्यास सुरू आहे. यासाठी रॉकेट कार्गो अर्थात रॉकेटच्या सहाय्याने मालवाहतूक करण्याच्या पर्यायाची घोषणा अमेरिकेच्या हवाईदलाने केली. अमेरिकन अंतराळ क्षेत्रात काम करणार्‍या ‘स्पेसएक्स’ कंपनीच्या स्टारशिप रियुजेबल रॉकेटचा पर्याय उत्तम ठरू शकतो, असे हवाईदलाने स्पष्ट केले.

अमेरिका लष्करी वाहतुकीसाठी रॉकेटचा वापर करण्याच्या तयारीतगेल्या वर्षीच अमेरिकेच्या हवाईदलाने यावर काम सुरू केले होते. यासाठी स्पेसएक्स आणि एक्सप्लोरेशन आर्किटेक्चर कॉर्पोरेशन या कंपन्यांबरोबर छोटा करार करण्यात आला होता. या पर्यायाचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकन हवाईदलाच्या 2022 च्या बजेटमध्ये पाच कोटी डॉलर्सचा प्रस्ताव देण्यात आला आहे. रियुजेबल रॉकेट पारंपरिक प्रक्षेपण तळाव्यतिरिक्त दुर्गम ठिकाणी किंवा अपारंपरिक पृष्ठभागांवर उतरविण्याची क्षमता विकसित करणे, तसेच रॉकेट लँड करू शकत नाही अशा ठिकाणी रॉकेटमधून कार्गो एअर-ड्रॉप करणे, याचा अभ्यास केला जाणार आहे.

याशिवाय रियुजेबल रॉकेटमधून 30 ते 100 टन वजन वाहून नेण्याची क्षमता असावी. फक्त मालवाहतूक नव्हे तर भविष्यात अमेरिकी जवानांच्या तैनातीसाठी रियुजेबल रॉकेट सहाय्यक ठरू शकतो, असा दावा अमेरिकेच्या हवाईदलाने केला. सध्या अमेरिकेची अवजड लष्करी वाहतूक करणारे ‘सी-17’ विमान जितक्या वजनाचे साहित्य नेऊ शकते, निदान तितक्या वजनाचे साहित्य हे रॉकेट जगातल्या कुठल्याही देशात एका तासात पोहोचवू शकेल, असे ध्येय अमेरिकेच्या हवाई दलाने आपल्यासमोर ठेवले आहे.अमेरिका लष्करी वाहतुकीसाठी रॉकेटचा वापर करण्याच्या तयारीत

यासाठी एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचा चांगला पर्याय समोर आहे. पण ही एकच कंपनी या शर्यतीत नसल्याचे अमेरिकन हवाईदलाच्या रिसर्च लॅब्रोटरीचे प्रमुख डॉ. ग्रेग स्पँजर्स यांनी स्पष्ट केले. स्पेसएक्स प्रमाणे जेफ बेझॉस यांची ब्ल्यू ओरिजिन तसेच लायडॉस डायनेटिक्स आणि इतरही काही कंपन्या या शर्यतीत असल्याचे डॉ. स्पँजर्स यांनी सांगितले.

अमेरिकेच्या हवाईदलाने अवजड लष्करी मालवाहतुकीसाठी रॉकेटचा वापर करण्याची योजना याआधीही मांडली होती. पण लष्कराच्या मालवाहू विमानांपेक्षा रॉकेटच्या प्रक्षेपणावर अधिक खर्च होत असल्याने ही योजना बारगळली होती. पण स्पेसएक्सने रियुजेबल रॉकेटचा यशस्वी वापर केल्यानंतर हवाईदलाने पुन्हा या योजनेवर काम सुरू केले आहे.

leave a reply