इस्रायलच्या हल्ल्यानंतर सिरियातील इराणसंलग्न गटाकडून प्रत्युत्तराचा इशारा

इराणसंलग्नदमास्कस – सिरियाच्या पालमिरा येथील इराणच्या लष्करी तळावर इस्रायलने चढविलेल्या हवाई हल्ल्यात नऊ जण ठार झाले. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी प्रवासी विमानांच्या आडून हल्ले चढविल्यामुळे हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करता आली नाही, असा आरोप इराणने केला. यानंतर सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या या हल्ल्यांना जोरदार उत्तर देण्याची धमकी दिली आहे. यावरुन इस्रायलच्या हल्ल्यात इराणसंलग्न गटाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे.

सिरियाच्या होम्स प्रांतातील पालमिरा शहरावर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन वृत्तसंस्थेने केला. या हल्ल्यात कम्युनिकेशन टॉवर तसेच काही ठिकाणांचे नुकसान झाल्याचा दावा सिरियन वृत्तसंस्थेने केला. पण ब्रिटनस्थित इराणसंलग्नसिरियन मानवाधिकार संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात पालमिराच्या टी-४ हवाईतळाजवळील इराणसंलग्न दहशतवादी संघटनेची ठिकाणे नष्ट झाली. यामध्ये नऊ जण ठार झाले असून यामध्ये इराणसंलग्न गटाच्या दहशतवाद्यांचा समावेश असल्याचे मानवाधिकार संघटनेने म्हटले आहे.

इराक-सिरिया-जॉर्डनच्या हवाई सीमेवरुन उड्डाण करणार्‍या दोन प्रवासी विमानांच्या आडून इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हे हल्ले चढविल्याचा आरोप सिरिया करीत आहे. इस्रायलच्या चार एफ-१६ लढाऊ विमानांनी सदर हल्ले चढविल्याची माहिती सिरियन हवाईदलाच्या अधिकार्‍यांनी दिली. प्रवासी विमानांच्या आडून हे हल्ले चढविल्यामुळे हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून प्रत्युत्तर देणे धोक्याचे ठरले असते. त्यामुळे सदर कारवाई टाळल्याचे सिरियन अधिकार्‍याने सांगितले.

इराणसंलग्नतर या हल्ल्यांमुळे जबर जीवितहानी व वित्तहानी सहन करावी लागलेल्या सिरियातील इराणसंलग्न दहशतवादी संघटनेने इस्रायलला प्रत्युत्तराचा इशारा दिला. पालमिरातील या हल्ल्यांसाठी जोदार प्रत्युत्तर मिळेल, अशी धमकी इराणसंलग्न गटाने दिली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी सिरिया-इराकच्या सीमेवरील अल-तन्फ येथील इराणच्या लष्करी तळावर हवाई हल्ले चढविणार्‍या अमेरिकेलाही कठोर उत्तर देण्यात येईल, असे या गटाने धमकावले. अल-तन्फमधील हल्ल्यातही इराणसंलग्न गटाला जीवितहानी सोसावी लागली होती. तसेच क्षेपणास्त्रांच्या कोठाराचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला होता.

दरम्यान, सिरियन लष्कर, माध्यमांकडून होणार्‍या आरोपांवर इस्रायलने प्रतिक्रिया दिलेली नाही. पण काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या लष्करी अधिकार्‍यांनी सिरियातील इराणसंलग्न गटांवरील कारवाई सुरू राहणार असल्याचे बजावले होते.

leave a reply