‘जीएव्हीआय’ला भारताचे दीड कोटी डॉलर्सचे सहाय्य

Gaviनवी दिल्ली – जगभरातील गोरगरिबांना विविध रोगांवरील लसी उपलब्ध करून देणाऱ्या ‘ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन ॲण्ड इम्युनिसेशन’ला (जीएव्हीआय) भारताने दीड कोटी डॉलर्सचा निधी जाहीर केला आहे. गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ‘व्हर्च्युअल ग्लोबल व्हॅक्सिन समिट’चे आयोजन केले होते. या परिषदेला भारतासह ५० हून अधिक देशांचे नेते, जागतिक संघटनांचे अधिकारी, विविध संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली.

सध्या कोरोनाव्हायरच्या साथीने जगभरात थैमान घातले असून या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या साथीवर लस विकसित करण्याचे प्रयत्न अनेक देश आणि संशोधन संस्था करीत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘व्हर्च्युअल ‘ग्लोबल व्हॅक्सिन समिट’चे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाव्हायरसच्या साथीपासून साऱ्या जगाचे रक्षण व्हावे यासाठी जगभरातील राष्ट्रांना निधी देण्याचे आवाहन ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केले.

Vaccine”सध्याच्या आव्हानांच्या काळात काळात भारत जगासोबत एकजुटीने उभा आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम’ ही अशी आमची शिकवण आहे. या साथीच्या काळात देशाने या शिकवणीनुसार जगण्याचा प्रयत्न केला आहे.”, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. तसेच भारताने १२० देशांना आपल्याकडील औषधांचा पुरवठा केल्याची आठवणही पंतप्रधानांनी यावेळी करून दिली. या साथीने जगातिक सहकार्याच्या सीमा किती व्यापक असायला हव्यात हे दाखवून दिल्याचे पंतप्रधान म्हणाले.

यावेळी ‘जीएव्हीआय’ या आंतरराष्ट्रीय संघटनेला १.५ कोटी डॉलर्सचे आर्थिक सहाय्य पंतप्रधानांनी घोषित केले. लसी आणि औषधांच्या किंमती कमी असाव्यात असे सांगून भारताने उत्कृष्ट दर्जाची औषधे आणि लसीचे उत्पादन कमी किंमतीत करण्याची आपली क्षमता सिद्ध केली आहे. कमी खर्चात लसीचे उत्पादन घेण्यासाठी भारत सहाय्य करण्यासाठी तयार आहे, अशी ग्वाही यावेळी पंतप्रधानांनी दिली.

तसेच संसर्गजन्य रोगांच्या विरोधात लसीकरणाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमावर जगाने भारतावर विश्वास ठेवला पाहिजे. जगातील ६० टक्के मुलांना भारतात उत्पादन करण्यात येणारी लस दिली जात असल्याचा दाखला यावेळी पंतप्रधानांनी दिला.

leave a reply