अफगाणिस्तानामधल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये १८ जणांचा बळी

काबूल – शनिवारी अफगाणिस्तानमधल्या दोन दहशतवादी हल्ल्यात १८ जणांचा बळी गेला आहे. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या प्रकरणी तालिबानवर संशय व्यक्त केला जातो. दोनच दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी तालिबानसोबत चर्चेची तयारी दाखविली होती. त्याला काही तास उलटत नाही तोच अफगाणिस्तानमध्ये हल्ल्यांचे सत्र सुरु झाले.

अफगाणिस्तान, दहशतवादी हल्ला,

शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या घोर प्रांतातल्या पोलीस चेक पॉईंटवर हल्ला चढविला. यात दहा पोलीस ठार झाले असून एक जण जखमी झाला आहे. तालिबानने आपण हा हल्ला केला नसल्याचे म्हटले आहे. पण तालिबाननेच हा हल्ला चढविल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. याला काही तास उलटत नाही तोच अफगाणिस्तानच्या खोस्त प्रातांत अज्ञात बंदुकधांऱ्यानी माजी सैनिकाला लक्ष्य केले. या हल्ल्यात आठ जणांचा बळी गेला आहे. या हल्ल्याच्या एक दिवस आधी अफगाणिस्तानच्या प्रार्थनास्थळाबाहेर स्फोट झाला होता. यात चार जणांचा बळी गेला होता. तालिबानने याचा निषेध केला होता. दरम्यान, गेल्या दोन आठवड्यात तालिबानने अफगाणिस्तानमध्ये घडविलेल्या हल्ल्यात ८९ जणांचा बळी गेला आहे. तर १५० हून अधिक जखमी झाल्याचे ‘नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल’ने म्हटले.

leave a reply