ईशान्येकडील राज्यांमधील फळे-भाज्यांच्या हवाई वाहतुकीवर ५० टक्के सवलत

हवाई वाहतुकनवी दिल्ली – ‘ऑपरेशन ग्रीन्स स्कीम’अंतर्गत ईशान्ये भारतातील आणि हिमालयीन राज्यांमध्ये पिकणाऱ्या फळे आणि भाज्यांच्या हवाई वाहतुकीवर ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी या राज्यांमध्ये पिकणाऱ्या ४१ फळे आणि भाज्यांची निवड करण्यात आली आहे. याआधी सरकारने ‘किसान रेल’द्वारे होणाऱ्या मालवाहतुकीवर शेतकऱ्यांना ५० टक्के सवलत दिली होती.

हवाई वाहतुकईशान्ये भारतातील आणि हिमालयीन राज्यांसाठी देण्यात आलेल्या हवाई सवलतीनुसार कितीही प्रमाणात फळे आणि भाज्यांची वाहतूक करता येईल. भाज्यांमध्ये कांदे, बटाटे, टोमॅटो, वांगी, गाजर, काकड्या, मिरच्या, ढोबळी मिरच्या, चवळीच्या शेंगा, फ्लॉवर, कोबी, भेंडी, आले, लसूण, वेलची आणि हळदीचा समावेश आहे. तर फळांमध्ये आंबे, केळी, संत्री, मोसंबी, पेरु, अननस, सफरचंद, चिकू, फणस, पपया, किवीचा समावेश आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर व लडाखच्या विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध असेल. तर ईशान्येकडील आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड आणि सिक्कीम राज्यांच्या विमानतळांवर ही सुविधा आहे. २०१८-१९ साली केंद्र सरकारच्या खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ‘ऑपरेशन ग्रीन्स ‘ उपक्रम सुरु केला होता. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला भाव मिळवून देणे हा योजनेमागील हेतू आहे. यासाठी देशातील मुख्य बाजारपेठांपर्यंत शेतकऱ्यांना माल पोहचविता यावा यासाठी विशेष किसान रेल्वे सुरु करण्यात आल्या. यामुळे वेळ, इंधनाच्या बचतीबरोबर मालाची नसीडीही कमी झाली आहे.

leave a reply