अफगाणी लष्कराच्या कारवाईत चोवीस तासात १३५ तालिबानी ठार

१३५ तालिबानीकाबुल – अफगाणिस्तानच्या लष्कराने गेल्या चोवीस तासात देशभरात केलेल्या कारवाईत १३५ तालिबानींना ठार केले. तसेच या दहशतवाद्यांकडून प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत व त्यांच्याकडील स्फोटकांचा साठा नष्ट करण्यात आला, असे अफगाणी संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. दरम्यान, अमेरिकेने सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतर तालिबानच्या अफगाणिस्तानातील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचा आरोप अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अहमद झिया सराज यांनी केला आहे.

अफगाणिस्तानच्या लष्कराने लघमान, लोगार, गझनी, वारदाक, हेरात, घोर, फरयाब, बाघलान, तखार, कुंदूझ, बल्ख आणि कंदहार या १२ प्रांतात तालिबानच्या विरोधात जोरदार कारवाई केली. १३५ तालिबानीअफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, या कारवाईत १३५ तालिबानी ठार व ९२ जखमी आहेत. यावेळी तालिबानी दहशतवाद्यांकडून सापडलेली ९२ आयईडी स्फोटके नष्ट केल्याचे अफगाणी संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले. देशात शांतता, स्थिरता प्रस्थापित व्हावी आणि देशाचे सार्वभौमत्व अखंडीत रहावे, यासाठी अफगाणिस्तानचे लष्कर यापुढेही कारवाई करीत राहिल, अशी घोषणा अफगाणी संरक्षण मंत्रालयाने केली.

यापैकी कंदहार प्रांतात लष्कराने केलेल्या कारवाईत तालिबानचा वरिष्ठ कमांडर मवालावी अहमद कंदाहारी याला ठार केले. अफगाणिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख सिराज यांनी मंगळवारी ही १३५ तालिबानीमाहिती दिली. त्याचबरोबर तालिबानच्या हल्ल्यांमध्ये फरक पडला नसल्याच आरोपही सिराज यांनी केला. गेल्या वर्षी अमेरिकेबरोबर केलेल्या करारानंतर तालिबानच्या हल्ल्यांमध्ये २४ टक्क्यांची वाढ झाली होती. तर बायडेन यांनी सैन्यमाघारीची घोषणा केल्यानंतर यात अधिकच वाढ झाल्याचा ठपका सिराज यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्याचबरोबर तालिबानने अल कायदाबरोबरचे संबंध कायम ठेवले असून हे दोहा कराराचे उल्लंघन असल्याची टीका सिराज यांनी केली.

तालिबानने ‘आयएस’ व इतर दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानात तळ ठोकण्यासाठी सहाय्य केल्याचे सिराज म्हणाले. ‘आयएस’च्या एकूण दहशतवाद्यांपैकी ६० टक्के जण पाकिस्तानी असल्याचे सिराज यांनी पत्रकारांना सांगितले. आत्तापर्यंत ‘आयएस’च्या ४०७ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले असून यामध्ये अस्लम फारुकी या पाकिस्तानी आयएस नेत्याचा समावेश घेतल्याची माहिती सिराज यांनी दिली. ‘आयएस’चे दहशतवादी तुर्कीतून इराण, पाकिस्तानचा प्रवास करून त्यानंतर अफगाणिस्तानात दाखल होतात, असा गंभीर आरोप सिराज यांनी केला.

leave a reply