कोरोनाच्या संकटानंतर टिकाऊ विकास साधण्यासाठी उत्पादन, तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढायला हवी

- आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास

मुंबई – जागतिक अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत असल्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या संकटात जागतिक अर्थव्यवस्थेवर यापूर्वी प्रचंड आघात झाले. याआधी जागतिक अर्थव्यवस्थेवर असे आघात झाल्याची उदाहरणे फार कमी आहेत. त्यामुळे कोरोनाच्या साथीच्या संकटात अर्थव्यवस्थेवर खोल परिणाम झाला आहे. भारताला या संकटानंतर शाश्‍वत विकास साधायचा असेल, तर पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूकीबरोबर उत्पादन क्षेत्राचा विस्तारासाठी व विविध क्षेत्रात गुंतणुकीसाठी प्रयत्न करायला हवेत, असे स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले आहे.

कोरोनाच्या संकटानंतर टिकाऊ विकास साधण्यासाठी उत्पादन, तंत्रज्ञान, ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढायला हवी - आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दासभारतीय अर्थव्यवस्था अजूनही पुर्णपणे कोरोनाच्या संकटातून बाहेर आलेली नाही. मात्र ती वेगाने पूर्ववत होत आहे. कोरोनाच्या संकटाने विकसनशील देशांवर खूपच खोल परिणाम केला आहे. विशेषत: गरीबांवर मोठ्या प्रमाणावर या संकटाने आघात केले आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटानंतर अर्थव्यवस्थेला मजबूत करायचे असेल व त्याबरोबर टिकाऊ विकास साधायचा असेल तर श्रम आणि उत्पादन बाजारपेठेला अधिक चालना देईल, अशा उपायोजनांची आवश्यकता आहे, असे गव्हर्नर दास म्हणाले.

पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आवश्यक आहे. याशिवाय रचानात्मक सुधारणांची गरज आहे. विशेषत: उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, डिजिटल इनोव्हेशन, हरित तंत्रज्ञान, अक्षय ऊर्जा, या क्षेत्राकडे अधिक लक्ष पुरविण्याची व त्यामध्ये सुधारणांना चालना देणे भाग आहे. या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यायला हवे, असे दास यांनी अधोरेखित केले. यह क्षेत्रांचा विस्तार झाला, ही क्षेत्र मजबूत झाली, तर श्रम बाजारातही वाढ होईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यासाठी प्रशिक्षीत कामगारांची संख्या वाढविण्याचीही आवश्यकता असल्याचे दास यांनी सांगितले.

दरम्यान, एशियन डेव्हल्पमेंट बँकेने भारताचा विकासदराचा अंदाज घटविला आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत भारतीय अर्थव्यवस्थेला धक्का बसला असून यामुळे हा विकासदराचा अंदाज घटवून १० टक्के करण्यात आल्याचे एडीबीने म्हटले आहे.

leave a reply