तालिबानचे सरकार सत्तेवर येत असतानाच अफगाणिस्तानात भीषण अन्नटंचाई निर्माण होईल

- संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा

तालिबानचे सरकारकाबुल/संयुक्त राष्ट्र – मुल्ला हैबतुल्ला अखुंदझदाच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेची तयारी पूर्ण तालिबानने केली आहे. आपल्या गटतटांमधील वादावादी बाजूला सारून तालिबानला सरकार स्थापनेत यश मिळाले, तरी पुढच्या काळात तालिबानच्या सरकारची खरी कसोटी लागेल. कारण अफगाणिस्तानात महिनाभर पुरेल इतकाच अन्नधान्याचा साठा शिल्लक आहे. महिनारानंतर अफगाणिस्तानातील गोरगरीबांना सुमारे 20 कोटी डॉलर्स इतक्या रक्कमेच्या अन्नधान्याची गरज लागणार असल्याचे राष्ट्रसंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने बजावले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून तालिबानचे नेते सरकार स्थापनेमध्ये टोळीप्रमुख व छोट्या गटांच्या नेत्यांना स्थान देऊन त्यांची मर्जी राखत आहेत. तालिबानच्या या नव्या सरकारमध्ये पश्‍तू नेत्यांना स्थान मिळाल्याचा दावा केला जातो. पण लवकरच महिला आणि अफगाणिस्तानातील इतर अल्पसंख्यांकांनाही सामावून घेतले जाईल, असे तालिबानचे वरिष्ठ नेते माध्यमांना पटवून देत तालिबानचे सरकारआहेत. तालिबान सध्या कुठल्याही स्वरुपाचा वाद ओढावून घेण्याच्या तयारीत नाही, असेच तालिबानच्या प्रवक्त्यांच्या विधानांवरुन स्पष्ट होते.

अंतर्विरोध टाळण्यासाठी तालिबानने प्रयत्न केले आणि यामध्ये काहीअंशी त्यांना यश मिळाले तरी लवकरच मुल्ला अखुंदझदाला मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागेल. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अफगाणिस्तानच्या जनतेला भीषण अन्नटंचाईला सामोरे जावे लागेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार सहाय्याचे अफगाणिस्तानाती प्रतिनिधी रमिझ अलाकबारोव्ह यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

तालिबानचे सरकारसंयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’अंतर्गत अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरातून अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. गेली कित्येक वर्षे संघर्षामुळे विस्थापित झालेल्या अफगाणी विस्थापितांना हे सहाय्य पुरविले जाते. पण तालिबानने काबुलचा ताबा घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरातून अफगाणिस्तानला दिली जाणारे सहाय्य रोखले आहे. सर्वच देशांनी हात आखडते घेतल्यामुळे अफगाणिस्तानकडे फक्त महिनाभर पुरेल तालिबानचे सरकारइतकाच अन्नधान्याचा साठा असल्याचे अलाकबारोव्ह यांनी सांगितले.

अफगाणिस्तानातील अन्नधान्याची टंचाई टाळण्यासाठी किमान 20 कोटी डॉलर्सची आवश्‍यकता असल्याची माहिती अलाकबारोव्ह यांनी दिली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानच्या जनतेची उपासमारी टाळण्यासाठी सहाय्य करण्याचे आवाहन केले. तर अफगाणिस्तानचे माजी अर्थमंत्री खालिद पायेंदा यांनी आपल्या देशाचे चलनमूल्य वेगाने घसरत असल्याकडे लक्ष वेधले. अफगाणिस्तानचे चलन ‘अफगानी’चे मुल्य सध्या 88 डॉलर्स आहे. पण येत्या काही दिवसात अफगानीचे मुल्य 100 टक्क्यांपेक्षा जास्त घसरू शकते, असा इशारा पायेंदा यांनी दिला. असे झाले तर आपल्या देशातील जनता अधिकच बिकट समस्येला सामोरे जाईल, अशी चिंता पायेंदा यांनी व्यक्त केली.

leave a reply