इस्रायलला कोट्यवधी डॉलर्सची शस्त्रे पुरविण्याचा अमेरिकेचा निर्णय

- इराण, चीन, तुर्कीची टीका

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी सोमवारी इस्रायलसाठी ७३.५ कोटी डॉलर्सचे शस्त्रसहाय्य मंजूर केले. अमेरिकेच्या या निर्णयावर चीन, इराण आणि तुर्कीने जोरदार टीका केली. बायडेन रक्ताने माखलेल्या हाताने इतिहास लिहित असल्याचा आरोप तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी केला.

इस्रायलला कोट्यवधी डॉलर्सची शस्त्रे पुरविण्याचा अमेरिकेचा निर्णय - इराण, चीन, तुर्कीची टीकाएप्रिल महिन्यातच अमेरिकन कॉंग्रेसने इस्रायलसाठीच्या शस्त्रसहाय्याला मंजुरी दिली होती. बायडेन प्रशासनाने सोमवारी यावर शिक्कामोर्तब केले. यानुसार, अमेरिका इस्रायलला अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रे तसेच इतर शस्त्रसहाय्य पुरविणार असल्याचा दावा केला जातो. याशिवाय राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षबंदीला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचे बायडेन यांनी यावेळी स्पष्ट केले.

इस्रायल आणि गाझापट्टीत संघर्ष सुरू असताना बायडेन प्रशासनाने सदर शस्त्रसहाय्य मंजूर केल्यामुळे संतापलेल्या इराण आणि चीनने ताशेरे ओढले आहेत. बायडेन प्रशासनाने त्वरीत हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी या देशांनी केली आहे. तर ऑटोमन साम्राज्याचा अंत झाल्यानंतर अनेक भूभागांमध्ये भीषण रक्तपात होत आहे. पॅलेस्टिनींच्या भूभागात सुरू झालेला रक्तपात हा देखील त्याचाच भाग ठरतो, असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी म्हटले आहे.

leave a reply