तर अफगाणींच्या हत्येसाठी बायडेनच जबाबदार ठरतील

- अमेरिकन सिनेटर्सची टीका

वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील वेगवान माघारीच्या बायडेन यांच्या घोडचुकीमुळे आज तालिबान अमेरिकेच्या कोट्यवधी डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांनी सज्ज झाला आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सहकाऱ्यांवर त्यांचा वापर केला, तर बायडेन यांचे हात त्यांच्या रक्ताने माखलेले असतील, असा ठपका अमेरिकन काँग्रेसमन जिम बँक्स यांनी केला.

अमेरिकेच्या लष्कराची हमवी चिलखती वाहने, बायोमॅट्रिक्सने सज्ज ‘हाईड’ यंत्रणा तालिबानच्या हाती सापडल्याची कबुली अमेरिकेचे अधिकारी दबक्या आवाजात देत आहेत. अशी सुमारे 75 हजार वाहने, 200 हून अधिक विमाने व हेलिकॉप्टर्स, सहा लाख शस्त्रे, नाईट व्हिजन गॉगल्स असा शस्त्रसाठा सध्या तालिबानकडे आहे. अमेरिका वगळता जगातील इतर देशांकडे नसतील इतके ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स तालिबानकडे असल्याची माहिती बँक्स यांनी दिली. तालिबानचे दहशतवादी हे हेलिकॉप्टर्स उडवितानाचा व्हिडिओ समोर आला आहे.

त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत, तालिबान मोठ्या प्रमाणात शस्त्रसज्ज बनला आहे. यातील काही शस्त्रास्त्रे तालिबानने पाकिस्तानला रवाना केल्याच्या बातम्या आल्या होत्या. तर तालिबान काही शस्त्रास्त्रांचा चीनशी सौदा करणार असल्याचे बोलले जाते.

leave a reply