चीनमधील शेअरबाजारात मोठी घसरण

बीजिंग – गुरुवारी चीनच्या शेअबाजारात मोठी घसरण झाल्याचे समोर आले. चीनमधील प्रमुख शेअर निर्देशांक असणारा ‘शांघाय कम्पोझिट इंडेक्स’ दीड टक्क्यांनी खाली आला.

यामुळे तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश असणार्‍या ‘सीएसआय-३०० इंडेक्स’मध्ये तब्बल २.६८ टक्क्यांची घसरण झाली. तर हाँगकाँगमधील ‘हँग सेंग’ शेअरबाजार२.५५ टक्क्यांनी खाली आला आहे. कंपन्यांच्या मूल्यांकनासंदर्भातील चिंता, हे घसरणीचे प्रमुख कारण असल्याचे संकेत चीनमधील विश्‍लेषकांनी दिले आहेत.

leave a reply