अफगाणिस्तानच्या काबूलमधील स्फोटात पत्रकारासह तिघांचा बळी

काबूल – शनिवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात माजी वृत्तनिवेदकासह तिघांचा बळी गेला. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. माजी पत्रकाराला लक्ष्य करुन घडविलेल्या या स्फोटाचा अफगाणिस्तानाच्या सरकारने निषेध केला आहे. आठवड्याभरापूर्वीच काबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २२ जणांचा बळी गेला होता.

अफगाणिस्तानच्या काबूलमधील स्फोटात पत्रकारासह तिघांचा बळीशनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास अफगाणिस्तानच्या ‘टोलो’ वृत्तसंस्थेचे माजी वृत्तनिवेदक यामा सिआवाश यांच्या गाडीला लक्ष्य करून आयईडी स्फोट घडविण्यात आला. टीव्हीवर एका प्रसिद्ध राजकीय क्रार्यक्रमाचे ते सूत्रसंचालनही करीत होते. सध्या यामा सिआवाश हे अफगाणिस्तानच्या सेंट्रल बँकेत सल्लागार पदावर कार्यरत होते. शनिवारी बँकेच्या वाहनातून जात असताना हा हल्ला झाला. यावेळी त्यांच्यासोबात बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि वाहन चालक ड्रायव्हर होता. या स्फोटात तिघांचा जागीच बळी गेला.

अफगाणिस्तानच्या काबूलमधील स्फोटात पत्रकारासह तिघांचा बळीपत्रकारांवर हल्ले चढवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याला लक्ष्य करणाऱ्या हल्ल्याचा अफगाणिस्तानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुलाह अब्दुलाह यांनी निषेध केला. यामा सिआवाश यांच्या जाण्याने देशाचे फार मोठे नुकसान झाले. हा कधीही न विसरता येणारा गुन्हा ठरतो, असे अब्दुलाह अब्दुलाह म्हणाले. अफगाणिस्तानमधील हा सर्वात हुशार वृत्तनिवेदक होता, असे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांच्या सल्लागारांनी म्हटले आहे. दरम्यान, २००१ सालापासून आतापर्यंत अफगाणिस्तानात ८० हून अधिक पत्रकार आणि माध्यमांमधील कर्मचाऱ्यांंचा बळी गेल्याचे सांगितले जाते.

leave a reply