आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे मुंबई शेअर बाजारात १६८८ अंकांची घसरण

- गुंतवणूकदारांचे ७.३५ लाख कोटी बुडाले

मुंबई – दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरिअंट आढळला आहे. तीन देशात आतापर्यंत या व्हेरियंट रुग्ण आढळले आहेत. तसेच कोरोना रुग्ण वाढू लागल्यावर काही देशांनी पुन्हा प्रवासी निर्बंध लावायला सुरूवात केली आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आहे. मुंबई सेन्सेक्स १६८८ अंकाने कोसळला, तर निफ्टी निर्देशांकही ५१० अंकाने कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे सुमारे ७.३५ लाख कोटींचे नुकसान झालो आहे.

आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे मुंबई शेअर बाजारात १६८८ अंकांची घसरण - गुंतवणूकदारांचे ७.३५ लाख कोटी बुडालेगेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सतत पडझड होत आहे. यामागे निरनिराळी कारणे होती. सोमवारीही मुंबई शेअर बाजार ११७० अंकाने कोसळला होता. यामध्ये रिलायन्स आणि युएईच्या अरामको कंपनीमधील १५ अब्ज डॉलर्सच्या कराराचे पुनर्मुंल्याकंन, पेटीएमच्या शेअरमध्ये झालेली घसरण ही कारणे होती. तर शुक्रवारी आठवड्याच्या अखेरच्या सत्रात झालेल्या घसरणीमागे आफ्रिकेत आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट कारणीभूत ठरला आहे. तसेच परदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांकडून (एफपीआय) सुरू असलेला विक्रीचा मारा हेसुद्धा एक कारण आहे. गुरुवारी २३०० कोटी रुपये एफपीआयने बाजारातून काढून घेतले होते.

गेल्या आठवडाभरात मुंबई शएर बाजार २५२८ अंकाने (४.२४ टक्के) आणि निफ्टी निर्देशांक ७३८.३५ (४.१५) टक्क्यांनी कोसळला आहे. या आठवड्यातच भारतीय शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे एकूण १४ लाखाहून अधिक कोटींचे नुकसान झाल्याचे दावे करण्यात येत आहे. मुंबई सेन्सेक्स आपल्या उच्चांकापासून ५१३८ अंकाने कोसळला आहे. ही घसरण आठ टक्क्यांची आहे. १९ ऑक्टोबरला मुंबई शेअर बाजाराने उच्चांक गाठला होता. तेव्हापासून शेअर बाजाराचे भांडवली मूल्य एकूण २ कोटी ७४ लाख ६९ हजार ६०६ वरून दोन कोटी ५८ लाख ३० हजार कोटी रुपयांपर्यंत खाली घसरले आहे.

leave a reply