ऑस्ट्रेलियाला पाश्‍चात्य देशांपासून वेगळे करण्याचे चीनचे प्रयत्न

- अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा आरोप

वॉशिंग्टन/कॅनबेरा/बीजिंग – ‘चीनकडून ऑस्ट्रेलियाला समविचारी पाश्‍चात्य देशांच्या गटापासून तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अमेरिकेला वाटते. ऑस्ट्रेलियावर त्याचे काय परिणाम होतात आणि ऑस्ट्रेलियाचा दृष्टिकोन बदलतो का हे बघण्याचा उद्देश यामागे आहे’, असा आरोप अमेरिकेचे ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राचे समन्वयक कर्ट कॅम्पबेल यांनी केला. यावेळी कॅम्पबेल यांनी, चीनने कितीही प्रयत्न केले तरी अमेरिका कधीही ऑस्ट्रेलियाला एकाकी पडू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील दिली. कॅम्पबेल यांच्या या वक्तव्यावर चीनकडून प्रतिक्रिया उमटली असून, चीन इतर कोणत्याही देशाच्या अंतर्गत व्यवहारात ढवळाढवळ करीत नसल्याचा खुलासा परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला.

ऑस्ट्रेलियाला पाश्‍चात्य देशांपासून वेगळे करण्याचे चीनचे प्रयत्न - अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा आरोपचीन हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश म्हणून ओळखण्यात येतो. 2019 साली ऑस्ट्रेलियाच्या एकूण व्यापारात चीनचा वाटा तब्बल 29 टक्के इतका होता. मात्र गेल्या दोन वर्षात ऑस्ट्रेलिया व चीनमधील संबंध वेगाने चिघळण्यास सुरुवात झाली आहे. चीनकडून ऑस्ट्रेलियाच्या विविध क्षेत्रांमध्ये प्रभाव वाढविण्यात आला असून त्या जोरावर हस्तक्षेप सुरू झाला आहे. हा हस्तक्षेप रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन व सरकारने आक्रमक निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत चीनविरोधात अनेक विधेयके मंजूर करण्यात आली असून त्यात चीनकडून असलेल्या धोक्यांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मॉरिसन सरकारकडून सुरू असणार्‍या या कारवाईमुळे चीन प्रचंड अस्वस्थ झाला असून आपल्या आर्थिक व व्यापारी ताकदीचा वापर करून ऑस्ट्रेलियावर दडपण टाकण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

ऑस्ट्रेलियाला पाश्‍चात्य देशांपासून वेगळे करण्याचे चीनचे प्रयत्न - अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा आरोपचीनचे इतर देशांबरोबरही वाद असले तरी ऑस्ट्रेलियाला अधिक आक्रमकरित्या लक्ष्य करण्यात येत असल्याचे दिसत आहे. यावर आपली भूमिका मांडताना कर्ट कॅम्पबेल यांनी, ऑस्टे्रलियाविरोधात सुरू असलेल्या कारवायांमागे चीनचे वेगळे हेतू असल्याचा दावा केला. मात्र चीनच्या कारवाईचे उलट परिणाम होत असून, ऑस्ट्रेलिया व अमेरिका अधिकच जवळ आल्याचे कॅम्पबेल यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियातील मॉरिसन सरकार व अमेरिकेतील बायडेन प्रशासन केवळ समविचारी नसून त्यांचे उद्देशही समान आहेत, अशी ग्वाही अमेरिकेच्या अधिकार्‍यांनी दिली.

ऑस्ट्रेलियाला पाश्‍चात्य देशांपासून वेगळे करण्याचे चीनचे प्रयत्न - अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा आरोपऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॉरिसन यांनी ‘क्वाड’साठी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख करून, त्यांच्या प्रयत्नांमुळे अमेरिकेने पॅसिफिक व आशियातील हालचालींना वेग दिल्याचा दावाही कॅम्पबेल यांनी केला. कॅम्पबेल यांनी केलेल्या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या अर्थमंत्र्यांनीही चीनबरोबरील संबंधांबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

अर्थमंत्री जोश फ्रायडनबर्ग यांनी, चीनबरोबरील संबंधांचा विचार करता ऑस्ट्रेलिया नेहमीच राष्ट्रीय हितसंबंधांना अधिक महत्त्व देईल, अशी ग्वाही दिली आहे. त्याचवेळी चीनकडून ऑस्ट्रेलियात होणारी गुंतवणूक केवळ आर्थिक स्तरावरची नसून त्यामागे धोरणात्मक उद्देश असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी फ्रायडनबर्ग यांनी दोन देशांमधील संबंध पूर्वीसारखे राहिले नसल्याचीही कबुली दिली.

leave a reply