‘कोरोना लॅब लीक’वरून चीनचा अमेरिकेवरच प्रत्यारोप

‘कोरोना लॅब लीक’

बीजिंग – कोरोनाची साथ पसरविल्याचे गंभीर आरोप होत असलेल्या चीनने संतप्त प्रतिक्रिया देऊन आपल्यावरील हे आरोप नाकारले होते. पण आता चीन यावर खुलासा देत असताना, अमेरिकेवरच जैविक युद्धाचा ठपका ठेवत आहे. अमेरिकेने 25 देशांमध्ये सुमारे 200 जैविक प्रयोगशाळा विकसित केलेल्या आहेत, त्याची माहिती उघड करा, अशी मागणी चीनकडून केली जात आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी माध्यमांसमोर ही मागणी केली.

सार्स, ईबोला, झिका यासारख्या भयंकर विषाणूंचा फैलाव नक्की कुणामुळे झाला, याचा जाब अमेरिकेने द्यावा, असे वेनबिन यांनी म्हटले आहे. याबाबतचे सत्य जगाला कळायला हवे, असे वेनबिन म्हणाले. मात्र या साथींची माहिती असूनही चीनने याबाबत आजवर मौन का पाळले, ही बाब वेनबिन यांनी उघड केलेली नाही. कोरोनाच्या फैलावावरून आपल्यावर आरोप झाल्यानंतर आता चीन अमेरिकेकडे बोट दाखवित आहे, ही बाब चीनवरील संशय अधिकच वाढविणारी ठरते.

‘कोरोना लॅब लीक’अमेरिकेच्या जैविक प्रयोगशाळेवरच जैविक युद्धाचा आरोप करून चीन अमेरिकेला संवेदनशील माहिती उघड करण्याची धमकी देत असण्याची शक्यता यामुळे समोर आलेली आहे. मात्र कोरोनाच्या नव्या साथी जगाला टाळायच्या असतील, तर याच्या उगमाचा सखोल तपास करणे आवश्यक आहे. नाहीतर पुढच्या काळात अशा साथी जगावर धडकत राहतील, असा इशारा संशोधक देत आहेत.

आत्ताच रोखले नाही तर चीन पुढच्या काळात आपले राजकीय, सामरिक आणि आर्थिक हेतू साधण्यासाठी नवनव्या साथींचे प्रयोग जगावर करीत राहिल, हेच संशोधक वेगळ्या शब्दात सांगत आहेत. म्हणूनच कोरोनाच्या मूळाचा तपास करा व ही साथ पसरविणार्‍या चीनला त्यासाठी जबाबदार धरा, असे संशोधक तसेच प्रमुख देशांच्या गुप्तचर विभागाचे माजी अधिकारी बजावत आहेत. या मागणीला जगभरातून मिळत असलेला प्रतिसाद चीनला धडकी भरविणारा ठरतो. म्हणूनच त्यावर चीनकडून अत्यंत जहाल प्रतिक्रिया येत आहेत.

leave a reply