तैवानमधील राजवट उलथण्यासाठी चीनकडून आक्रमक दबावतंत्राचा वापर

- तैवानी अभ्यासगटाचा दावा

दबावतंत्राचा वापरबीजिंग/तैपई – तैवानविरोधात प्रत्यक्षात युद्ध न लढता त्या देशातील जनतेची भूमिका बदलून व सध्याची चीनविरोधी राजवट उलथून ताबा मिळविता यावा, यासाठी चीनच्या सत्ताधार्‍यांकडून ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’चा वापर करण्यात येत असल्याचा दावा तैवानमधील आघाडीच्या अभ्यासगटाने केला. कोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनने ही मोहीम अधिक तीव्र केली आहे. तैवानच्या जनतेवर एकाच वेळी लष्करी आणि बौद्धिक व मानसिक पातळीवर दबाव टाकून बचावात्मक मानसिकता तयार करणे, हा ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’चा उद्देश असल्याचेही तैवानी अभ्यासगटाने म्हटले आहे.

तैवान सरकारचा भाग असलेल्या ‘इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल डिफेन्स अ‍ॅण्ड सिक्युरिटी रिसर्च’(आयडीएसआर) या अभ्यासगटाने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला. या अहवालात चीनकडून सुरू असलेल्या दबावतंत्राचा वेध घेण्यात आला आहे.दबावतंत्राचा वापर तैवानसारख्या लोकशाहीवादी देशात प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाला असलेल्या स्वातंत्र्यांचा फायदा उचलून चीन तैवानी जनतेची भूमिका बदलण्यासाठी आक्रमक प्रयत्न करीत असल्याचे ‘आयडीएसआर’ने म्हटले आहे.

‘तैवानच्या राष्ट्राध्यक्ष ‘त्साई इंग-वेन’ यांच्या सरकारला सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. तैवानमधील सामाजिक तणाव व राजकीय दुफळी वाढावी यासाठी हालचाली सुरू आहेत. त्याचवेळी तैवानी जनतेत लोकशाहीला असलेले समर्थन कमी व्हावे म्हणून योजना आखण्यात येत आहेत’, असे ‘आयडीएसआर’च्या अहवालात सांगण्यात आले आहे. दबावतंत्राचा वापरयात इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत असून यामागे चीनचे लष्कर सक्रिय असल्याचा दावाही तैवानी अभ्यासगटाने केला आहे. खोट्या माहितीचा मोठ्या प्रमाणात प्रसार करणे व हॅकिंगच्या सहाय्याने गोपनीय तसेच अडचणीत आणणारी माहिती समोर आणणे यासारख्या पद्धतींचा वापर होत असल्याचेही ‘आयडीएसआर’ने म्हटले आहे.

गेल्या वर्षाच्या सुरुवातील तैवानमध्ये झालेल्या निवडणुकांपूर्वीही चीनने ‘कॉग्निटिव्ह वॉरफेअर’चा वापर केला होता. मात्र त्यात चीनच्या सत्ताधारी राजवटीला यश मिळाले नाही. उलट त्साई इंग-वेन यांना मिळालेल्या विजयामुळे चीनसमोरच्या अडचणी अधिकच वाढल्या. पण तरीही चीनने तैवानचे सरकार व जनतेविरोधात दबावतंत्राचादबावतंत्राचा वापर वापर कायम ठेवल्याचे ‘आयडीएसआर’च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीने गेल्या वर्षी विशेष कायद्याचा वापर करून हाँगकाँगवर ताबा मिळविला होता. हाँगकाँगच्या ताब्यानंतर तैवान हे पुढील लक्ष्य असल्याच्या धमक्या चीनकडून देण्यात येत होत्या. त्यासाठी चीनने लष्करी पातळीवर युद्धासाठी तयारी केल्याचेही समोर आले होते. तैवानच्या क्षेत्रात सातत्याने घुसखोरी करून चीनने सामरिक पातळीवर तैवानी लष्कर दबावाखाली राहिल, याची काळजी घेतली होती. आता दुसर्‍या बाजूने तैवानचे सरकार व जनतेला दबावाखाली ठेऊन तैवानवर पूर्ण ताबा मिळविण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असल्याचे अभ्यासगटाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

leave a reply