चीन तालिबानला मान्यता देण्यास तयार

- अमेरिकी वृत्तसंस्थेचा दावा

वॉशिंग्टन/दोहा – लष्करी बळाचा वापर करून तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतला, तर त्याला आपण मान्यता देणार नाही, असे अमेरिकेसह जगभरातील 12 प्रमुख देशांनी जाहीर केले आहे. यात चीनचाही समावेश आहे. पण अधिकृत पातळीवर ही भूमिका घेणाऱ्या चीनने गुप्तपणे तालिबानला मान्यता देण्याची तयारी केल्याचा खळबळजनक दावा अमेरिकी वृत्तसंस्थेने केला आहे. काही दिवसांपूर्वी तालिबानच्या शिष्टमंडळाने चीनला भेट दिली होती व त्यावेळीही चीन तालिबानला अनुकूल भूमिका घेणार असल्याचे संकेत दिले जात होते.

चीन तालिबानला मान्यता देण्यास तयार - अमेरिकी वृत्तसंस्थेचा दावाअफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी कतारची राजधानी दोहा येथे संबंधित देशांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत अमेरिका, भारत, ब्रिटन, जर्मनी, नॉर्वे, कतार, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, तुर्की, चीन या देशांबरोबर संयुक्त राष्ट्रसंघ आणि युरोपिय महासंघाने तालिबानची अफगाणिस्तानातील राजवट मान्य करणार नसल्याचे एकमताने जाहीर केले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राईस यांनी ही माहिती प्रसिद्ध केली.

या बैठकीत चीनने अधिकृतरित्या तालिबानविरोधी भूमिका घेतली असली तरी गुप्तपणे तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याची तयारी चीनने केली आहे. येत्या काळात अफगाणिस्तानातील राष्ट्राध्यक्ष गनी यांचे सरकार उधळून सत्तेवर येणाऱ्या तालिबानला चीनच्या कम्युनिस्ट राजवटीने मान्यता द्यावी, असे चीनच्या लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेने तयार केलेल्या अहवालात सुचविले आहे. अमेरिकेतील वृत्तसंस्थेने ही माहिती उघड केली.

गेल्या महिन्यात तियांजीन येथे तालिबानच्या नेत्यांबरोबर झालेल्या झालेल्या बैठकीत चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी तसे संकेत दिले होते.

leave a reply