चीनची राजवट नाझी जर्मनी सारखीच – मेघालयाचे राज्यपाल तथागत रॉय

नवी दिल्ली – नाझींनी ज्याप्रमाणे ज्यू धर्मियांचा संहार केला, त्याप्रमाणे चीनची कम्युनिस्ट राजवट उघुरवंशीयांचा संहार करत आहे. त्यामुळे नाझींची जर्मनीतील राजवट आणि चीनच्या कम्युनिस्ट राजवटीमध्ये बरेच साधर्म्य आहे, अशी जळजळीत टिका मेघालायचे राज्यपाल तथागत रॉय यांनी केली आहे.

China-Nazhiगलवान व्हॅलीमध्ये भारतीय सैनिकांवर हल्ला चढवून पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात करणाऱ्या चीनच्या विरोधात देशभरात संतापाची भावना आहे. त्यातच चीनने एकाचवेळी जवळपास सर्वच शेजारी देशांच्या भूमी तसेच सागरी क्षेत्रांवर दावे ठोकले असून यामुळे चीनच्या विरोधात रोष वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसची साथ चीनमुळेच जगभरात पसरली आणि सारे जग त्याची भयंकर किंमत चुकती करत आहे त्याची खात्री जवळपास सर्वच प्रमुख आणि जवाबदार देशांना पटलेली आहे. यामुळे चीनच्या विरोधातील असंतोषाला आंतरराष्ट्रीय स्वरूप आलेले आहे.

अशा काळात चीनच्या निर्दय व अमानवी राजवटीचा खरा चेहरा जगासमोर आला असून उघुरवंशीयांचा संहार, तिबेटी जनतेवरील अत्याचार, हाँगकाँगमधील दडपशाही आणि तैवानवरील आक्रमणाची भाषा यामुळे चीनविषयीच्या संतापात भर पडते आहे यापार्श्वभूमीवर चिनी राजवटीच्या या कारवाया दुसरे महायुद्ध भडकवणाऱ्या नाझी-जर्मनी प्रमाणेच असल्याचा ठपका ठेवून मेघालयचे राज्यपाल तथागत रॉय यांनी या देशाला लक्ष्य केले आहे.

काही दिवसांपूर्वी लेह येथे भारतीय सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद मोदी यांनी थेट नामोल्लेख टाळून चीनच्या विस्तारवादावर मर्मभेदी प्रहार केले होते. साऱ्या जगाला विस्तारवादी शक्तीपासून धोका संभवतो. पण अखेरीस अशा विस्तारवादी शक्तींचा पराभव होतो किंवा त्यांना माघार घ्यावीच लागते असे पंतप्रधान म्हणाले होते. वेगळ्या शब्दात चीनचा विस्तारवाद जगासमोर भयंकर संकटांची मालिका उभी करत असल्याचा इशारा पंतप्रधानांनी दिला होता, त्याचवेळी अशा विस्तारवादाचा अंत पराभवातच होतो याचीही आठवण पंतप्रधानांनी चीनला नेमक्या शब्दात करून दिली होती.

leave a reply