चीननेच कोरोनाचा विषाणू जगभरात पसरविला – डॉ. ली-मेंग यान यांचा आरोप

वॉशिंग्टन – ‘कोरोनाचा विषाणू नैसर्गिक नाही. चीनने प्रयोगशाळेतच याची निर्मिती केली. इतकेच नाही तर कोरोनाचा विषाणू चीनने जाणीवपूर्वक जगभरात पसरविला. याचे पुरावे माझ्याकडे आहेत’, असे चीनच्या संशोधिका ‘डॉ. ली-मेंग यान’ यांनी जाहीर केले. चीनमधून बाहेर पडून अमेरिकेत आश्रय घेतलेल्या डॉ. ली-मेंग यान यांनी अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हा दावा केला. कोरोनामुळे सुरू असलेला हाहाकार चीनला अपेक्षितच होता, अशी खळबळजनक माहिती डॉ. ली-मेंग यांनी दिली.

कोरोनाचा विषाणूचीनच्या वुहान येथील प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा विषाणू बाहेर पडला. मात्र ही ‘लॅब-लीक’ची थिअरी पूर्णपणे खोटी असल्याचा बचाव चीन करीत आहे. त्याचवेळी चीनच्या प्रभावाखाली असलेली जागतिक आरोग्य संघटना देखील या आघाडीवर चीनचा बचाव करून सारवासारवी करू पाहत आहे. मात्र कोरोनाचा विषाणू म्हणजे चीनने तिसर्‍या महायुद्धात वापरलेले जैविक शस्त्रच असल्याचा आरोप जगभरातील जबाबदार संशोधक करू लागले आहेत. त्याला दुजोरा देणारे पुरावेही उघड होत आहेत. अशा परिस्थितीत चीनमध्ये व्हायरॉलॉजीचा अभ्यास करणार्‍या डॉ. ली यांनी केलेले दावे जगभरातील वृत्तसंस्था उचलून धरत आहेत.

कोरोनाचा विषाणू नैसर्गिक नाही. असे असूनही हा विषाणू नैसर्गिक असल्याचे दावे केले जातात, हा अपप्रचार व धूळफेकीचा प्रयत्न ठरतो. मी कोरोनाचा विषाणू नैसर्गिकरित्या आलेला नाही, तर तो प्रयोगशाळेत जन्माला घातलेला आहे, हे मी सिद्ध करून दाखवू शकते. जगातील अग्रगण्य व्हायरॉलॉजिस्टसोबत मी काम केलेले आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवातून मी हा विषाणू प्रयोगशाळेतच तयार करण्यात आलेला आहे, हे मी आत्मविश्‍वासाने सांगू शकते’, असे डॉ. ली-मेंग यान यांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या साथीने जगभरात जो हाहाकार माजविलेला आहे, तो चीनच्या लष्कराला अपेक्षित होता. हा विषाणू जगात हा विध्वंस माजविण्यासाठीच पसरविण्यात आलेला आहे, असे गंभीर आरोप डॉ. ली-मेंग यान यांनी केले. याआधी एका ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने जनरलच्या हुद्यावर असलेल्या चिनी लष्करी अधिकार्‍यांचे पत्र प्रसिद्ध करून कोरोना हे चीनचे जैविक शस्त्र असल्याचे सिद्ध केले होते. तिसर्‍या महायुद्धासाठी कोरोनाच्या विषाणूचा शस्त्रासारखा वापर करण्याची योजना या पत्रात चीनच्या लष्करी अधिकार्‍याने मांडली होती. त्यामुळे डॉ. ली यांच्याकडून केले जाणारे आरोप निराधार नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. त्याचवेळी आपल्यावर होत असलेल्या या आरोपांमुळे चीन कमालीचा असुरक्षित बनलेला आहे, हे देखील जगसमोर येत आहे.

फॉक्स न्यूज या अमेरिकी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. ली-मेंग यान यांनी चीनवर हे गंभीर आरोप केले. त्यांची मुलाखत घेणार्‍या टकर कार्लसन यांनी डॉ. ली यांचा आवाज दडपण्यासाठी माध्यमे, बड्या टेक कंपन्या आणि चीनची कम्युनिस्ट राजवट आपला प्रभाव वापरत असल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर ज्या वुहान येथील प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू तयार झाला, त्याच प्रयोगशाळेला अमेरिकी करदात्यांचा पैसा पुरविण्यात आला होता, याकडे कार्लसन यांनी लक्ष वेधले.

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे आरोग्यविषयक सल्लागार डॉ. टोनी फॉसी यांचीच यांच्या स्वाक्षरीने हे अनुदान वुहानच्या प्रयोगशाळेला पुरविण्यात आले होते, ही बाब कार्लसन यांनी लक्षात आणून दिली. अमेरिकन संसदेतही हा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता व त्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली. अमेरिकन संसदेच्या समितीने या प्रकरणी डॉ. फॉसी यांना विचारणाही केली होती.

leave a reply