चीनच्या ‘थ्री गॉर्जेस धरणा’मुळे वुहानमध्ये पूरस्थिती

बीजिंग – ‘थ्री गॉर्जेस धरणा’मधून केलेला पाण्याचा प्रचंड विसर्ग आणि सातत्याने कोसळणारा पाऊस यामुळे चीनच्या वुहान शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसात वुहानमध्ये विक्रमी पाऊस कोसळू शकतो, असा इशारा स्थानिक यंत्रणा देत आहेत. या पार्श्वभूमीवर, वुहान शहर पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याची तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, ‘जागतिक आरोग्य संघटने’चे (डब्ल्यूएचओ) चौकशी पथक पुढच्या आठवड्यात वुहान शहरात दाखल होणार आहे. वुहानमधून कोरोनाव्हायरसचा फैलाव झाल्याचा आंतरराष्ट्रीय स्तरातून होत असलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सदर पथक वुहानमध्ये उतरणार होते. ही चौकशी टाळण्यासाठी चीननेच ही पूरस्थिती निर्माण केल्याचे आरोप होऊ लागले आहेत.

चीनच्या ‘थ्री गॉर्जेस धरणा’मुळे वुहानमध्ये पूरस्थितीगेल्या काही दिवसांपासून चीनच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू असलेल्या पावसाने आत्तापर्यंत १२१ जणांचा बळी घेतला आहे. या मुसळधार पावसामुळे चीनच्या यांग्त्झे नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यातच चीनने ‘थ्री गॉर्जेस’ या आपल्या सर्वात मोठ्या धरणातील पाण्याचा विसर्गही सुरू केला आहे. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे धरणाच्या बांधकामाला धोका निर्माण झाल्याचे सांगून स्थानिक यंत्रणांनी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू केल्याचे म्हटले आहे. पण, यामुळे यांग्त्झे नदीच्या तीरावर वसलेल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून यामध्ये वुहान शहराचाही समावेश आहे. त्यातच वुहान शहरांमध्ये येत्या काही दिवसात विक्रमी पावसाची नोंद होऊ शकते, असे इशारेही दिले जात आहेत. या पार्श्वभूमीवर, वुहानमध्ये दुसऱ्या स्तराचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

चीनच्या ‘थ्री गॉर्जेस धरणा’मुळे वुहानमध्ये पूरस्थितीपुढील ३१ दिवसात वुहानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे वुहानमधील नागरिकांवर पुन्हा एकदा लॉकडाउनचे संकट घोंघावत असून काही चिनी कार्यकर्त्यांनी यासाठी स्थानिक यंत्रणांवर टीका केली आहे. मुसळधार पावसामुळे हा पूर आल्याचे वाटू शकते. पण, थ्री गॉर्जेस धरणातील विसर्ग या पूरामागील महत्त्वाचे कारण असल्याचा आरोप वँग वेलूओ यांनी केला. चीनमधील हायड्रोलॉजिस्ट आणि थ्री गॉर्जेस धरणावरील वीज प्रकल्पाचे कडवे विरोधक म्हणून वँग यांची ओळख आहे. तर, कोरोनाव्हायरसच्या फैलावासंबंधी चीनच्या विरोधात जाणारे पुरावे नष्ट करण्यासाठी वुहान आणि आजूबाजूच्या भागात ही पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप मानवाधिकारांसाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्यांनी जेनिफर झेंग यांनी केला आहे.

leave a reply