‘ऑकस डील’वर टीका करणार्‍या चीनला ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी फटकारले

‘ऑकस डील’कॅनबेरा/बीजिंग – अमेरिकेबरोबर केलेला नवा करार यापूर्वीची भागीदारी व आघाड्यांना अनुसरून आहे, अशा शब्दात ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी चीनला फटकारले आहे. अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या व्यापक संरक्षण सहकार्य करारानुसार, ऑस्ट्रेलियाला आठ आण्विक पाणबुड्या पुरविणार आहे. या करारावर, चीनचे प्रवक्ते तसेच प्रसारमाध्यमांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. हा करार ऑस्ट्रेलियाला अणुयुद्धाचे लक्ष्य बनवू शकतो, असे चिनी माध्यमांनी धमकावले होते.

ऑस्ट्रेलियाला इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांतता व स्थैर्य हवे आहे. अमेरिकेबरोबर केलेला करार यापूर्वी असलेली भागीदारी, आघाडी व द्विपक्षीय संबंधांना अनुसरूनच आहे’, अशा शब्दात ‘ऑकस डील’पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शुक्रवारी चीनच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यापूर्वी गुरुवारी एका कार्यक्रमात, मॉरिसन यांनी अमेरिकेकडून हॉक तसेच ‘टॉमाहॉक क्रूझ मिसाईल्स’ घेण्यात येणार असून दीर्घ पल्ल्याच्या हल्ल्यांसाठीची क्षमताही वाढविण्यासाठी सहकार्य घेण्यात येईल, असे वक्तव्य केले आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौर्‍यावर जात असून, या पार्श्‍वभूमीवर ही बाब लक्ष वेधून घेणारी ठरते.

अमेरिका, ब्रिटन व ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या ‘ऑकस डील’वर चीनकडून अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ‘आण्विक ‘ऑकस डील’पाणबुडीसाठीचे तीन देशांमधील सहकार्य क्षेत्रिय शांतता व स्थैर्याला कमकुवत करणारे आहे. या करारामुळे शस्त्रस्पर्धा वाढण्याची भीती आहे. त्याचवेळी अण्वस्त्रप्रसारबंदीसंदर्भातील प्रयत्नांनाही धक्का बसला आहे’, असे टीकास्त्र चीनच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी सोडले आहे. त्याचवेळी अमेरिका व ब्रिटन अण्वस्त्रांच्या मुद्यावर दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने ऑस्ट्रेलिया तसेच अमेरिकेला धमकावले आहे. ‘आण्विक पाणबुड्यांच्या करारामुळे ऑस्ट्रेलिया अणुयुद्धाचे लक्ष्य बनू शकतो. मॉरिसन यांच्या महत्त्वाकांक्षेपासून ऑस्ट्रेलियाला धोका असून त्यांना मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे’, असे ग्लोबल टाईम्सने बजावले. त्याचवेळी पुढील काळात अमेरिकेच्या हवाई बेटांजवळ तसेच गुआम तळानजिक चीनच्या युद्धनौका गस्त घालताना दिसतील, असा इशाराही ग्लोबल टाईम्सने दिला आहे.

leave a reply