तैवानच्या मुद्यावर परदेशी हस्तक्षेप चीन कधीही खपवून घेणार नाही

- चीनच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा इशारा

बीजिंग – जी७ आणि नाटोच्या बैठकीत लोकशाहीवादी देशांनी चीनच्या एकाधिकारशाहीवर ताशेरे ओढून तैवानला उघड पाठिंबा दिला. यामुळे बिथरलेल्या चीनने तैवानच्या हद्दीत अणुबॉम्बने सज्ज असलेली विमाने रवाना करून तैवानसह पाश्‍चिमात्य देशांना इशारा दिला आहे. तैवानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणार्‍या या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरातून पडसाद उमटू लागल्यानंतर चीनने आपल्या या कारवाईचे समर्थन केले. तैवानच्या मुद्यावर जाणुनबूजून होणारा परदेशी हस्तक्षेप कदापि खपवून घेणार नसल्याची धमकी चीनने दिली. त्याचबरोबर लढाऊ व बॉम्बर विमानांच्या घुसखोरीनंतर चीनने आपली ड्रेजर जहाजे तैवानच्या सागरी हद्दीजवळ रवाना केली आहेत.

तैवानच्या मुद्यावर परदेशी हस्तक्षेप चीन कधीही खपवून घेणार नाही - चीनच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा इशारागेल्या रविवारी ब्रिटनच्या कॉर्नवॉल येथे पार पडलेल्या ‘जी७’च्या बैठकीत लोकशाहीवादी देशांनी चीनवर जोरदार हल्ला चढविला होता. ‘चीन तैवानच्या हवाई व सागरी सार्वभौमत्वाचा अनादर करीत आहे. चीनच्या कारवायांमुळे या क्षेत्रातील शांतता आणि स्थैर्य धोक्यात आली आहे’, अशी टीका जी७ देशांनी संयुक्त निवेदनाद्वारे केली होती. जी७च्या बैठकी पाठोपाठ ब्रुसेल्स येथे होणार्‍या नाटोच्या बैठकीतही तैवानचा मुद्दा उपस्थित होणार होता. नाटोच्या अधिकार्‍यांनी माध्यमांमध्ये बोलताना चीनमुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात निर्माण झालेल्या तणावाचा मुद्दा उपस्थित केला होता.

तैवानच्या मुद्यावर परदेशी हस्तक्षेप चीन कधीही खपवून घेणार नाही - चीनच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा इशाराजी७ व नाटोच्या या भूमिकेमुळे संतापलेल्या चीनने मंगळवारी पहाटे तैवानच्या हवाईहद्दीत २८ विमाने रवाना केली. यामध्ये लढाऊ विमानांबरोबर अणुबॉम्बने सज्ज असलेल्या बॉम्बर विमानांचा देखील समावेश होता. आंतरराष्ट्रीय स्तरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. पाश्‍चिमात्य माध्यमांनी चीनच्या या घुसखोरीवर जोरदार टीका केली. पण हा एक सरावाचा भाग असल्याचे सांगून चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने चिनी विमानांच्या घुसखोरीचे समर्थन केले होते.

तैवानच्या मुद्यावर परदेशी हस्तक्षेप चीन कधीही खपवून घेणार नाही - चीनच्या वरिष्ठ अधिकार्‍याचा इशारातर बुधवारी चीनच्या तैवानविषयक विभागाचे प्रवक्ते मा शिओगुआंग यांनी माध्यमांसमोर येऊन या कारवाईमागे जी७ने तैवानबाबत दिलेली प्रतिक्रिया या कारवाईला जबाबदार असल्याचे संकेत दिले. ‘स्वतंत्र तैवानची मागणी किंवा याप्रकरणी परदेशी हस्तक्षेप चीन कदापि खपवून घेणार नाही. चीनचा हा इशारा सर्वांनी ध्यानात घ्यावा, म्हणून ही कारवाई केली’, असे सांगून शिओगुआंग यांनी तैवानमधील त्साई ईंग-वेन यांचे लोकनियुक्त सरकार तसेच तैवानला समर्थन देणार्‍या लोकशाहीवादी देशांना धमकावले.

दरम्यान, लढाऊ आणि बॉम्बर विमानांप्रमाणे चीनच्या ड्रेजर अर्थात गाळ काढणार्‍या जहाजांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तैवानची राजधानी तैपेईपासून काही अंतरावर असलेल्या बेटाच्या हद्दीत चिनी जहाजे गाळ काढण्याचे काम करीत असल्याचे जपानी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. तैवानच्या सागरी हद्दीतील चीनच्या जहाजांच्या या कारवाईवर आंतरराष्ट्रीय स्तरातून प्रतिक्रिया येऊ शकते.

leave a reply