अमेरिका-ऑस्ट्रेलियातील युद्धसरावावर नजर ठेवण्यासाठी चीनचे हेरगिरी जहाज रवाना

सिडनी – अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या युद्धसरावामुळे अस्वस्थ झालेल्या चीनने यावर नजर ठेवण्यासाठी आपले हेरगिरी जहाज रवाना केले आहे. याआधी चीनने अमेरिका-ऑस्ट्रेलियातील सरावावर हेरगिरी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण पहिल्यांदाच हेरगिरीसाठी दोन जहाजे रवाना करून चीनने सदर युद्धसरावाबाबत असलेली बेचैनी दाखवून दिली. दरम्यान, अमेरिकेच्या लष्कराने देखील या सरावात पॅट्रियॉट क्षेपणास्त्र यंत्रणेची यशस्वी चाचणी घेतली.

अमेरिका-ऑस्ट्रेलियातील युद्धसरावावर नजर ठेवण्यासाठी चीनचे हेरगिरी जहाज रवानाअमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील ‘तालिस्मान सॅबर’ हा द्वैवार्षिक युद्धसराव आहे. साधारण महिनाभर चालणार्‍या या सरावात दोन्ही देशांची मरिन्स मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदाच्या सरावात अमेरिकेच्या पॅसिफिक कमांडचे हवाईदल तसेच मिसाईल डिफेन्स युनिस्ट सहभागी झाले आहेत. गेल्या आठवड्यात सुरू झालेल्या या सरावावर नजर ठेवण्यासाठी चीनने आपले हेरगिरी जहाज रवाना केल्याची बातमी याआधी प्रसिद्ध झाली होती. पण चीनचे आणखी एक हेरगिरी जहाज पापुआ न्यू गिनी बेटदेशाजवळ पोहोचले आहे.

अमेरिका-ऑस्ट्रेलियातील युद्धसरावावर नजर ठेवण्यासाठी चीनचे हेरगिरी जहाज रवानाऑस्ट्रेलियन माध्यमांनी चिनी हेरगिरी जहाजाची ही बातमी प्रसिद्ध केली. तालिस्मान सॅबर युद्धसरावावर नजर ठेवण्यासाठी चीनने दोन जहाजे रवाना करणे फारच विलक्षण असल्याचे ऑस्ट्रेलियन वृत्तवाहिनीचे म्हणणे आहे. ऑस्ट्रेलियन सरकारने चिनी जहाजाच्या या हालचालीची दखल घेतली. सागरीवाहतुकीच्या स्वातंत्र्याच्या नियमांविषयी ऑस्ट्रेलिया बांधिल असून इतरांनीही त्याचे पालन करावे, अशी अपेक्षा ऑस्ट्रेलियाचे व्यापारमंत्री डॅन तेहान यांनी व्यक्त केली. तर चिनी जहाजामुळे ऑस्ट्रेलिया घाबरल्याचा दावा चीनची माध्यमे करीत आहेत.अमेरिका-ऑस्ट्रेलियातील युद्धसरावावर नजर ठेवण्यासाठी चीनचे हेरगिरी जहाज रवाना

दरम्यान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील यंदाच्या युद्धसरावामुळे चीन बेचैन झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्‍लेषक करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून चीनबरोबर निर्माण झालेल्या तणावात ऑस्ट्रेलियाच्या मॉरिसन सरकारने आक्रमक भूमिका घेतली. त्याचबरोबर चीनला रोखणार्‍या अमेरिकेच्या नेव्हल टास्क फोर्समध्ये ऑस्ट्रेलियाने सहभागाचे संकेत दिले. चीनच्या विरोधात अमेरिका-ऑस्ट्रेलिया स्ट्रॅटेजिक प्लानिंग करीत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडील लष्करी तळ अद्ययावत करण्याची घोषणा मॉरिसन सरकारने केली होती. तेव्हा बेचैनी वाढलेल्या चीनने आपली दोन जहाज रवाना केल्याचे आंतरराष्ट्रीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply