चीनची पाणबुडी अमेरिकेला लक्ष्य करणार्‍या क्षेपणास्त्रांनी सज्ज

पाणबुडीबीजिंग – काही दिवसांपूर्वी चीनच्या नौदलात सामील झालेली ‘टाईप ०९४ए’ आण्विक पाणबुडी ‘जेएल-३’ बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने सज्ज असल्याचे चिनी माध्यमांचे म्हणणे आहे. सदर क्षेपणास्त्र अमेरिकेच्या ईशान्येकडील भागापर्यंत मारा करण्याची क्षमता राखून असल्याचा दावा ही माध्यमे करीत आहेत.

गेल्या आठवड्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन विनाशिका आणि एका पाणबुडीचे जलावतरण केले होते. यामध्ये ‘टाईप ०९४ए’ या पाणबुडीचा समावेश होता. याआधीची ‘टाईप ०९४’ पाणबुडी आवाज करायची म्हणून त्यातील हायड्रोकायनेटिक आणि टर्ब्युलंट यंत्रणेवर काम करून प्रगत पाणबुडी तयार केल्याचा दावा चीन करीत आहे.

त्याचबरोबर याआधीच्या जेएल-२ या क्षेपणास्त्राच्या ऐवजी नव्या पाणबुडीवर जेएल-३ क्षेपणास्त्रे बसविण्यात आली आहे. यामुळे चिनी पाणबुडीच्या मारकक्षमतेत वाढ झाल्याचा आणि सेकंड स्ट्राईक क्षमता प्राप्त केल्याचा दावा चीनची माध्यमे करीत आहेत.

leave a reply