यावर्षी महाराष्ट्रात 13 ठिकाणी ढगफुटी

- रत्नागिरीत जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

मुंबई – वेळेत आगमन झाल्यानंतर दडी मारलेल्या पावसाने जुलैचा आठवडा उलटून गेल्यावर पुनरागमन केले. त्यानंतर कित्येक ठिकाणी विक्रमी पाऊस झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून कोकणात सर्व जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. हवामानखात्याने दिलेल्या महितीनुसार यंदा राज्यात बरसलेल्या पावसाने बरेच विक्रम नोंदविले आहेत. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात पावासाने सारे विक्रम मोडले असून मेघालयाच्या चेरापुंजीनंतर सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरीत झाली आहे. तसेच राज्यात आतापर्यंत 13 ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्याची माहिती हवामानखात्यातर्फे देण्यात आली.

यावर्षी महाराष्ट्रात 13 ठिकाणी ढगफुटी - रत्नागिरीत जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंदयावर्षी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या पावसाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. दरवर्षी महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वरमध्ये होते. मात्र याबाबतीत यावर्षी महाबळेश्वरला मागे टाकून देशातील सर्वाधिक पावसाची नोंद होत असलेले दुसरे ठिकाण रत्नागिरी ठरले आहे. 21 जुलैपर्यंत रत्नागिरीमध्ये 1200 एमएमपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

याशिवाय महाराष्ट्रात यावर्षी 13 ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्याची माहिती हवामानविभागातर्फे देण्यात आली. एका तासात 100 एमएमपेक्षा जास्त पाऊस झाला, तर त्याला जागतिक परिणामानुसार ढगफुटी म्हटले जाते. जागतिक हवामान संघटनेने सांगितलेल्या परिमाणानुसार ढगफुटीत बसतील अशा 13 घटना यावर्षी राज्यात घडल्याचे हवामानखात्याने अधोरेखित केले. ताम्हीणी घाट, चिपळूण, महाबळेश्वरात अशा ढगफुटीची नोंद झाली आहे. ताम्हीणी घाटात 468 एमएम, महाबळेश्वरमध्ये 480 एमएम आणि चिपळूणमध्ये 400 एमएम पाऊस झाला, असे हवामानखात्याकडून सांगण्यात आले.

leave a reply