देशभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४५० च्या पुढे

मुंबई – देशात कोरोनाव्हायरसमुळे बळींची संख्या 9 वर गेली आहे, तर लागण झालेल्यांची संख्या 450 च्या पुढे पोहोचली आहे. केंद्र व राज्य सरकारने अतिआवश्यक असल्याखेरीज कारण घराबाहेर पडू नका अशा सूचना दिल्या असल्या तरी, नागरिकांकडून ह्याचे पालन होताना दिसत नाही. यावर पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त करण्यात आली. ‘कित्येक नागरिक लॉकडाऊन गांभीर्याने घेताना दिसत नसून राज्य सरकारांनी कायदा व नियमाचे पालन नागरिकांकडून करून घ्यावे’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाराष्ट्र सरकारने राज्यभरात ‘कर्फ्यू’ची घोषणा केली. तसेच सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

देशभरात कोरोनाव्हायरसचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी केंद्र आणि सर्व राज्यसरकारांतर्फे कडक पाऊले उचलण्यात येत आहेत, मात्र ‘सोशल डिस्टसिंग’ अर्थात जमावापासून दूर राहण्याच्या आवाहनाचे काही नारिकांनकडून पालन होताना दिसत नाही. रविवारच्या ‘जनता कर्फ्यू’ ला नागरीकांनी प्रतिसाद देत बंद पाळला असला तरी सोमवारी पुन्हा काही ठिकाणी रस्त्यावर वाहतूक वाढल्याचे दिसून आले. तसेच जमावबंदी लागू असूनसुद्धा नागरीक रस्त्यावर उतरल्याचे दिसले. यावर पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. देशातल्या २५ राज्यांनी कोरोना विषाणूंचे रुग्ण आढळलेल्या जिल्हा व शहरांमध्ये लॉकडाऊन केले आहे. देशात लॉकडाऊन करण्यात आलेल्या जिल्ह्यांची संख्या ८६ वर पोहोचली आहे. मात्र नागरिक हे लॉकडाऊनला गांभीर्याने घेताना दिसत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अधिक कडक पाऊले उचलण्यात येत आहेत. सर्व स्थानिक हवाई वाहतूक सेवा थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याआधीच रेल्वेसेवा थांबविण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात १९ नवे रुग्ण आढळून आले असून राज्यातील रुग्णांची संख्या ९२ वर पोहोचली आहे. यातील ८ जण परदेशातून परतले होते. कोरोना विषाणूचा सामुदायिक संसर्ग वाढत असल्याची भीती बळावत चालली आहे. हे पाहता महाराष्ट्र सरकारने सोमवारी ‘कर्फ्यू’ची घोषणा केली. हा निर्णय तात्काळ लागूही करण्यात आला. या संचारबंदीच्या नियमनाचे पालन न करणाऱ्यावर कठोर कारवाईचे संकेत सरकारने दिले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनांना काटकोर अंमलबजवाणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात बंद करण्यात आल्या आहेत. या वाहतूक बंदीमध्ये खाजगी वाहनेसुद्धा असल्याचे सरकराने स्प्ष्ट केले. कार्यालयांना आणि शाळांना सुट्ट्या दिल्यामुळे सार्वजनिक आणि खाजगी वाहनाने गावी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या ‘कर्फ्यू’मधून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे.

मुंबईत २५ मार्च पर्यंत वृत्तपत्र प्रकाशित केली जाणार नाहीत. तर पुण्यात ३१ मार्च पर्यंत अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान देशातील इतर राज्यातही कोरोना रुगणाची संख्या वाढत आहे. केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची संख्या ९५ वर गेली आहे. एकाच दिवसात केरळात २८ नवे रुग्ण आढळून आले. या नंतर केरळ सरकारने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन घोषित केला. संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करणारे केरळ चौथे राज्य आहे. केरळच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत.

leave a reply