संरक्षणदलांमध्ये स्वदेशी बनावटीच्या ड्रोनविरोधी यंत्रणेचा समावेश होणार

- तिन्ही संरक्षणदलांचा डीआरडीओ व भेलबरोबर करार

नवी दिल्ली – जून महिन्यात जम्मू-काश्‍मीरमध्ये वायुसेनेच्या तळावर ड्रोनद्वारे हल्ला झाला होता. त्यानंतर तिन्ही संरक्षणदलांना अशा प्रकारच्या ड्रोन हल्ल्यापासून बचावासाठी सज्ज रहाण्याचे निर्देश देण्यात आले होते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने(डीआरडीओ) ॲन्टी ड्रोन यंत्रणा विकसित केली असून वायुसेनेच्या तळावरील हल्ल्यानंतर काही महत्त्वाच्या ठिकाणी तातडीने ही यंत्रणा बसविण्यात आली होती. ही यंत्रणा आपल्या ताफ्यात दाखल करून घेण्यासाठी लष्कर, नौदल आणि वायुसनेने डीआरडीओबरोबर करार केला आहे. भारतीय संरक्षणदलांमध्ये सामील होणारी पहिली स्वदेशी ड्रोनविरोधी यंत्रणा ठरणार आहे.

डीआरडीओने विकसित केलेल्या डी4एस या ड्रोन विरोधी यंत्रणेच्या चाचण्या काही दिवसांपूर्वी घेण्यात आल्या होत्या. आता ही ड्रोन विरोधी यंत्रणा तिन्ही संरक्षणदलांमध्ये दाखल करून घेतली जाणार आहे. डीआरडीनोने विकसित केलेल्या या ड्रोनविरोधी यंत्रणेचा पुरविठा करण्यासाठी लष्कर, नौदल व वायुसेनेने भारत इलेक्ट्रोनिक्सबरोबर (भेल) करार केला आहे. डीआरडीओची यंत्रणा तीन पद्धतीने काम करते. ड्रोन हेरणे, त्याला प्रतिबंध करणे आणि ते उद्ध्वस्त करणाऱ्या या डी4एस यंत्रणेच्या स्थिर आणि मोबाईल आवृत्या आहेत. या दोन्ही आवृत्यांचा समावेश संरक्षणदलांमध्ये होणार आहे.

इमर्जन्सी खरेदी अधिकाराअंतर्गतच तिन्ही दलांकडून या यंत्रणेची खरेदी करण्यात येत आहे. 31 तारखेला संरक्षणदलांचे वरीष्ठ अधिकारी, डीआरडीओच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आला. या यंत्रणेचा पुरवठा तिन्ही दलांना वेगाने व कमी वेळात केला जाणार आहे. याशिवाय लकवर संरक्षण व गृहमंत्रालयाबरोबर आणखी यंत्रणेच्या खरेदीसाठी करार होण्याची शक्यता वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

leave a reply