पुढच्या 15 वर्षात सात कोटी आफ्रिकी निर्वासित युरोपात धडकतील

- जर्मनीच्या संसद सदस्यांचा आरोप

बर्लिन – युरोपिय महासंघाकडून आखण्यात आलेला नवा ‘मायग्रेशन पॅक्ट’ भयानक असून त्यामुळे पुढील 15 वर्षात सुमारे सात कोटी आफ्रिकी निर्वासित युरोपात धडकू शकतात, असा इशारा युरोपियन संसदेतील जर्मन सदस्य गुनार बेक यांनी दिला आहे. गेल्याच महिन्यात आफ्रिकेतून घुसणार्‍या निर्वासितांना रोखण्यासाठी स्पेनने आपल्या सीमेवर लष्कर तैनात केल्याचे समोर आले होते. तर या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यातच इटलीत 10 हजारांहून अधिक निर्वासितांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्याची माहिती नुकतीच सरकारकडून देण्यात आली आहे.

पुढच्या 15 वर्षात सात कोटी आफ्रिकी निर्वासित युरोपात धडकतील - जर्मनीच्या संसद सदस्यांचा आरोपगेल्या दशकात जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या नेतृत्त्वाखाली राबविण्यात आलेल्या ‘ओपन डोअर पॉलिसी’मुळे युरोपात निर्वासितांचे लोंढे मोठ्या प्रमाणात घुसण्यास सुरुवात झाली होती. त्याविरोधातील असंतोषाची तीव्रता वाढू लागल्याने गेल्या दोन वर्षात घुसखोरी रोखण्यासाठी काही आक्रमक निर्णय घेतले होते. मात्र कोरोनाची साथ व त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर युरोपात पुन्हा एकदा निर्वासितांना दरवाजे खुले करून देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. युरोपिय महासंघाचा ‘पॅक्ट ऑन मायग्रेशन अ‍ॅण्ड असायलम’ त्याचाच भाग असल्याचा आरोप जर्मनीतील ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’चे (एएफडी) नेते व युरोपियन संसदेतील सदस्य गुनार बेक यांनी केला.

‘‘मी स्वतः काही काळ ‘पॅक्ट ऑन मायग्रेशन अ‍ॅण्ड असायलम’चा अभ्यास केला आहे. या कराराची अंमलबजावणी होणे युरोपसाठी विनाशकारी ठरु शकते. युरोपिय महासंघाकडून 2035 सालापर्यंत सात कोटी आफ्रिकी निर्वासितांना युरोपात आणण्याचे जाहीर केले होते, हे लक्षात ठेवायला हवे. आपली अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी याची आवश्यकता नाही’’, या शब्दात बेक यांनी युरोपात नवे निर्वासितांचे लोंढे आदळू शकतात असे बजावले.पुढच्या 15 वर्षात सात कोटी आफ्रिकी निर्वासित युरोपात धडकतील - जर्मनीच्या संसद सदस्यांचा आरोप

सात कोटी ही संख्या कदाचित काहींना खूप मोठी वाटत असेल, पण आमच्या सदस्यांनी युरोपियन कमिशनसमोर ही बाब मांडली, तेव्हा त्यातील कोणीही ही आकडेवारी नाकारली नाही, याकडेही बेक यांनी लक्ष वेधले. काही वर्षांपूर्वी युरोपात वृद्ध नागरिकांची संख्या वाढत असल्याचे अहवाल प्रसिद्ध झाले होते. याचा आधार घेऊन युरोपिय महासंघाने इतर देशांमधून येणारे निर्वासित युरोपमधील लोकसंख्या व मनुष्यबळाचा समतोल कायम राखण्यासाठी आवश्यक असल्याचा दावा केला आहे.

मात्र युरोपात घुसणार्‍या आफ्रिकी व आखाती देशांमधील निर्वासितांमुळे युरोपिय समाज, मूल्ये व संस्कृती धोक्यात येत आहे. त्यामुळे युरोपियन जनतेतील असंतोष वाढत असून त्याचे गंभीर राजकीय व सामाजिक परिणामही काही देशांमध्ये दिसून येत आहेत. निर्वासितांविरोधात आक्रमक भूमिका घेणार्‍या उजव्या विचारसरणीच्या पक्षांना वाढते समर्थन मिळत असून काही देशांमध्ये निर्वासितांना रोखण्यासाठी कायदेही करण्यात येत आहेत.

leave a reply