चीनचे परराष्ट्रमंत्री व तालिबानमध्ये चर्चा

बीजिंग – अमेरिकेच्या माघारीबरोबर अफगाणिस्तानात मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत असलेल्या चीनने बुधवारी तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेत तालिबान महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्‍वास चीनने व्यक्त केला. तर अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर चीनविरोधी कारवायांसाठी होऊ देणार नसल्याचे आश्‍वासन तालिबानने चीनला दिले.

चीनचे परराष्ट्रमंत्री व तालिबानमध्ये चर्चाचीनचा झिंजियांग स्वतंत्र करून पूर्व तुर्कीस्तानची मागणी करणार्‍या ‘तुर्कीस्तान इस्लामिक मुव्हमेंट-टीआयएम’ ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानच्या हिंदूकुश तसेच पाकिस्तानात तळ ठोकून असल्याच्या इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दोन दिवसांपूर्वी दिला होता. टीआयएमपासून चीनच्या सुरक्षेला धोका असल्याचे राष्ट्रसंघाने आपल्या नव्या अहवालातून बजावले होते. त्यानंतर तालिबानच्या वरिष्ठ नेत्याने बुधवारी चीनचा दौरा करून परराष्ट्रमंत्री वँग यी यांची भेट घेतल्याचे दिसत आहे.

तालिबानचा दुसर्‍या क्रमांकाचा नेता मुल्लाह बरादर याने चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर केलेल्या चर्चेत अफगाणिस्तानचा चीनविरोधात वापर होऊ देणार नसल्याचे आश्‍वासन दिले. तसेच चीन विश्‍वासू मित्रदेश असल्याचा उल्लेख बरादर याने केला. पण तालिबानच्या नेत्याने टीआयएमचा उल्लेख करण्याचे टाळले.

leave a reply