‘डीआरडीओ’कडून लढाऊ विमानांसाठी अत्याधुनिक ‘चॅफ’ तंत्रज्ञान विकसित

नवी दिल्ली – भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) जोधपूर येथील डिफेन्स लॅबोरेटरीने शत्रूच्या रडारला गुंगारा देऊन वायुसेनेच्या लढाऊ विमानांचे संरक्षण करणारे ‘चॅफ’ तंत्रज्ञान विकसित केले आहे. यासंदर्भातील चाचण्या पूर्ण झाल्यावर हे तंत्रज्ञान भारतीय लढाऊ विमानांमध्ये बसवण्यासाठी वायुसेनेकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वीच युद्धनौकांचे शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून संरक्षण करणारे तंत्रज्ञान डीआरडीओने विकसित केले होते.

‘डीआरडीओ’कडून लढाऊ विमानांसाठी अत्याधुनिक ‘चॅफ’ तंत्रज्ञान विकसितचॅफ हे एक प्रकारची रडारला गुंगारा देणारी यंत्रणा असून त्याचा वापर जगभरातील विविध देशांच्या संरक्षणदलांकडून केला जातो. याद्वारे लढाऊ विमाने आणि युद्धनौकांना शत्रूच्या रडार फ्रिक्वेन्सी पासून वाचवून त्याचे संरक्षण केले जाते. ब्रिटन या क्षेत्रात आघाडीवर असून ब्रिटनच्या दोन कंपन्यांकडे हे तंत्रज्ञान आहे. या दोन कंपन्या चॅफची निर्मिती करतात. डीआरडीओच्या जोधपूर येथील लॅबोरेटरीने तयार केलेले हे तंत्रज्ञान तांत्रिकदृष्ट्या उत्तम दर्जाचे असल्याचा दावा केला जातो.

‘डीआरडीओ’कडून लढाऊ विमानांसाठी अत्याधुनिक ‘चॅफ’ तंत्रज्ञान विकसितडीआरडीओने वायुसेनेसाठी तयार केलेल्या चॅफ तंत्रज्ञानामध्ये चॅफ साहित्य आणि चॅफचे 118आय कार्टीजचा समावेश आहे. इन्फ्रारेड आणि रडार पासून असलेल्या धोक्याविरोधात सीएमडीएस प्रणालीचाही या तंत्रज्ञानात वापर करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रात अत्याधुनिक रडार तंत्रज्ञानापासून असणारे धोके वाढले आहेत. त्यामुळे डीआरडीओने तयार केलेले हे तंत्रज्ञान अतिशय महत्त्वाचे ठरते.

दरम्यान, ‘चॅफ’संदर्भातल्या चाचण्या झाल्यानंतर भारतीय वायुसेनेकडून या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. वायुसेनेला आवश्‍यक त्या प्रमाणात दरवर्षी चॅफ साहित्याचा पुरवठा व्हावा. यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या सहाय्याने खाजगी उद्योगांना त्याचे उत्पादन करण्यासाठी सुपूर्द करण्यात येत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या यशाबद्दल डीआरडीओची प्रशंसा केली असून आत्मनिर्भर भारत भारतासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

leave a reply