आक्रमकता न रोखल्यास चीनचा भारत व तैवानशी संघर्ष पेटेल

- विश्‍लेषक गॉर्डन चँग यांचा निष्कर्ष

लंडन – चीनने आपल्या आक्रमक लष्करी हालचाली थांबविल्या नाहीत, तर भारत आणि तैवानबरोबर चीनचा संघर्ष होऊ शकतो, असा इशारा विख्यात विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी दिला आहे. चीनच्या आक्रमकतेमुळेच भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांचे क्वाड संघटन भक्कम बनले, असा दावा चँग यांनी केला. ब्रिटनच्या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत गॉर्डन चँग यांनी चीनपासून आपल्या सुरक्षेला असलेल्या धोक्याची जाणीव एव्हान सर्वच देशांना झालेली आहे, असा निष्कर्ष नोंदविला.

सध्या ऑस्ट्रेलिया आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. ऑस्ट्रेलियाने चीनच्या विरोधात कठोर निर्णय घेतले आहेत. कोरोनाच्या साथीचा उगम चीनच्या वुहान प्रयोगशाळेतून झाला, याची निष्पक्ष व सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी ऑस्ट्रेलिया करीत आहे. चीनच्या लष्कराने तिसर्‍या महायुद्धात कोरोनाच्या साथीचा जैविक शस्त्रासारखा वापर करण्याची तयारी २०१५ सालापासून केली होती, असा गौप्यस्फोट करणारी बातमी ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्राने प्रसिद्ध केली. त्याच्याही आधी आपल्या कानावर युद्धाचे पडघम येत असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केला होता व चीनपासून आपल्या देशाला असलेला धोका परखडपणे मांडला होता.

आक्रमकता न रोखल्यास चीनचा भारत व तैवानशी संघर्ष पेटेल - विश्‍लेषक गॉर्डन चँग यांचा निष्कर्षअसे असले तरी चीन आणि ऑस्ट्रेलियामध्ये थेट युद्ध पेटणार नाही, असे गॉर्डन चँग यांनी म्हटले आहे. चीन ऑस्ट्रेलियाच्या विरोधात लष्करी कारवाई करून युद्ध छेडणे शक्य नाही. कारण दोन देशांमध्ये फार मोठे भौगोलिक अंतर आहे. म्हणूनच चीन ऑस्ट्रेलियाच्या विरोधात लष्करी कारवाई न करता, या देशाला लक्ष्य करण्यासाठी वेगळ्या पर्यायांचा वापर करील, असा लक्षणीय दावा चँग यांनी केला. स्पष्टपणे उल्लेख केलेला नसला तरी चीन ऑस्ट्रेलियाला वेगळ्या मार्गाने जेरीस आणू शकतो, ही बाब गॉर्डन चँग लक्षात आणून देऊन ऑस्ट्रेलियाला सावध करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

मात्र चीनने तैवान व भारताच्या विरोधात लष्करी हालचाली सुरू केलेल्या आहेत. यात वाढ झाली तर मात्र संघर्षाचा फार मोठा धोका संभवतो, असे चँग यांनी बजावले. सध्या चीनने तैवानच्या हवाई हद्दीतील घुसखोरीचे प्रमाण व तीव्रता वाढविली आहे. कुठल्याही क्षणी तैवानवर चीनचा हल्ला होऊ शकतो, अशी स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत अमेरिका देखील तैवानला सहाय्य पुरवू शकणार नाही आणि अमेरिका तैवानच्या बाजूने या युद्धात उतरली, तर अमेरिकेचाही पराभव होईल, अशा धमक्या चीन व चीनच्या हस्तकांकडून दिल्या जात आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्तंभलेखक असलेल्या गॉर्डन चँग यांनी दिलेल्या या इशार्‍याचे गांभीर्य वाढले आहे.

तर दुसर्‍या बाजूला लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रात लष्करी तैनाती वाढवून चीन भारतावरील दडपण वाढविण्याची तयारी करीत आहे. लडाखच्या एलएसीवर चीनने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करून पाहिला खरा. पण भारतीय लष्कराला मागे हटविण्यात चीन अपयशी ठरला. भारतीय सैन्य लडाखच्या एलएसीवर खंबीरपणे उभे राहिले आणि त्याचा चीनलाच जबर धक्का बसला, असे भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले होते. त्यांच्या या उद्गारांची चीनच्या सरकारी मुखपत्राने दखल घेतली होती. त्यामुळे आता लडाखच्या एलएसीचा मुद्दा चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. म्हणूनच लडाखच्या एलएसीनजिकच्या तिबेटमधील क्षेत्रात चीन मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती करीत आहे. भारतीय सैन्य चीनच्या या हालचालींवर करडी नजर रोखून आहे.

अशा परिस्थितीत चीन गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी लडाखच्या एलएसीवर किंवा एलएसीवरील अन्य ठिकाणी लष्करी धाडस करू शकेल. यातून दोन्ही देशांमध्ये संघर्ष उद्भवू शकतो, ही गॉर्डन चँग यांनी व्यक्त केलेली चिंता नाकारता येण्याजोगी नाही. तर दुसर्‍या बाजूला लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रात लष्करी तैनाती वाढवून चीन भारतावरील दडपण वाढविण्याची तयारी करीत आहे. लडाखच्या एलएसीवर चीनने भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करून पाहिला खरा. पण भारतीय लष्कराला मागे हटविण्यात चीन अपयशी ठरला. भारतीय सैन्य लडाखच्या एलएसीवर खंबीरपणे उभे राहिले आणि त्याचा चीनलाच जबर धक्का बसला, असे भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले होते. त्यांच्या या उद्गारांची चीनच्या सरकारी मुखपत्राने दखल घेतली होती. त्यामुळे आता लडाखच्या एलएसीचा मुद्दा चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. म्हणूनच लडाखच्या एलएसीनजिकच्या तिबेटमधील क्षेत्रात चीन मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती करीत आहे. भारतीय सैन्य चीनच्या या हालचालींवर करडी नजर रोखून आहे.

अशा परिस्थितीत चीन गमावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्यासाठी लडाखच्या एलएसीवर किंवा एलएसीवरील अन्य ठिकाणी लष्करी धाडस करू शकेल. यातून दोन्ही देशांमध्ये संघर्ष उद्भवू शकतो, ही गॉर्डन चँग यांनी व्यक्त केलेली चिंता नाकारता येण्याजोगी नाही.

leave a reply